Maharashtra Politics Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: शरद पवार यांच्या भूमिकेमुळे विरोधकांमध्ये संभ्रम; काका-पुतण्याच्या भेटीनंतर काँग्रेस आणि ठाकरे गटात खलबतं

Rashmi Puranik

Mumbai News: पुण्यात काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त भेट झाली. पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर भेट झाली. काका-पुतण्याच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

पुण्यात झालेल्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यात आज चर्चा झाली. या चर्चेनंतर शरद पवारांनी त्यांची बाजू स्पष्ट करावी, अशी मित्र पक्षाने भूमिका स्पष्ट केली आहे .

महाविकास आघाडीतील पक्षातील नेत्यांचं म्हणणं काय?

नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेनंतर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मित्र पक्षांनी भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार यांच्या भूमिकेमुळे महविकस आघाडीला फटका बसू शकतो. या भेटीमुळे लोकांमध्ये गैरसमज पसरत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मित्र पक्षाची भूमिका आहे.

दरम्यान, संजय राऊत हे शरद पवार यांची भेट घेऊन सदर मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याची माहिती आहे. काका-पुतण्याच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर झालेल्या आज बैठकीत महत्वाचा मुद्द्यावर चर्चा झाली आहे. शरद पवार यांच्या भूमिकेमुळे विरोधकांमध्ये संभ्रम झाल्याचंही दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील बैठकीत मराठा समाजासोबत दुजाभाव, योगेश केदार यांचा आरोप

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

Shirur Breaking News : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा!

Dangerous Tourist Destinations : भारतातील सर्वात खतरनाक पर्यटनस्थळे, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Mumbai Fight Video: बारच्या वॉचमनशी वाद; कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT