namdev shastri news Saam tv
मुंबई/पुणे

Namdev Shastri Controversy : नामदेव शास्त्रींविरोधात वारकरी आक्रमक; किर्तन रद्द करण्याची नामुष्की, कारण काय? VIDEO

Namdev Shastri Latest News : धनंजय मुंडेंचं समर्थन करणं महंत नामदेव शास्त्रींना महागात पडलंय. वारकऱ्यांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटल्यानंतर आता मराठा संघटनाही त्यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. यामुळे नामदेव शास्त्रींवर नेमकी कोणती नामुष्की ओढवली त्यावरचा हा विशेष रिपोर्ट

Snehil Shivaji

भगवानगढाचे महंत नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंचं समर्थन करणं चांगलंच भोवलंय. न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्रींनी आधी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला त्यानंतर आरोपींची मानसिकता समजून घेण्याची भाषा केली आणि हत्येच्या आरोपीचं समर्थन केल्यानं महंताच्या विरोधात राज्यभरात रोष दिसला.

महंताच्या एकतर्फी न्यायाविरोधात वारकरी सांप्रदाय आक्रमक झाला असून शास्त्रींनी आपलं वक्तव्य मागे घेण्याची मागणी करत राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. फक्त वारकऱ्यांनीच हा इशारा दिला नसून आता मराठा समाजानं देखिल महंत नामदेव शास्त्रींविरोधात आक्रमक भूमिका घेतलीये.

'धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानं शास्त्री माफी मागा', अशी मागणी शरद पवार गटाचे वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख विठ्ठल मोरे यांनी केली आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या भावानं महतांची भूमिका ऐकल्यानंतर थेट भगवान गड गाठलं आणि शास्त्रींना पुरावे दिले. आणि यानंतर महंत नामदेव शास्त्रींनी युटर्न घेत भगवान गढ आता देशमुखांच्या पाठिशी असल्याची भूमिका जाहीर केली खरी.

परंतु महतांच्या या संभ्रमात टाकणाऱ्या भूमिकांमुळे त्यांच्या विरोधात मराठा समाजानं आक्रमक होतं त्यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाला विरोध केला. आणि नामदेव शास्त्रींविरोधात वाढलेला संताप पाहता पोलिसांनी देखील 7 तारखेला देहूत होणाऱ्या महंत नामदेव शास्त्रींच्या किर्तनाचा कार्यक्रम रद्द केलाय. त्यामुळे मुंडेंच्या समर्थनात घेतलेली एकतर्फी भूमिका नामदेव शास्त्रींनी चांगलीच भोवली एवढं मात्र खरं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना कुणाची? सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरेसेनेला फटकारले; बेजबाबदार वक्तव्य थांबवा

PM Modi UAE Visit: तेल साठे ते एलपीजी पुरवठा; पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळाले?

Tragic Road Accident : भीषण अपघात! ट्रक धडकल्यानंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर तुंगभद्रा पुलावरून कोसळला, ६ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूरचे तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहचले

Shocking: पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना, २ महिलांचे केस कापून अर्धनग्न करत धिंड काढली

SCROLL FOR NEXT