Nalasopara Gym Trainer : वजन कमी करण्यासाठी किंवा शरीरयष्टी बनवण्यासाठी आपण जीमचा पर्याय निवडतो. पण व्यायामासाठी मार्गदर्शनाची गरज भासते. व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी, कोणता आहार घ्यावा, स्टेरॉयड्स घेणं किती धोकादायक ठरू शकतं का? याविषयी मार्गदर्शन महत्त्वाचं असतं. चांगली शरीरयष्टी बनवण्यासाठी आपल्यला ट्रेनर चांगले प्रशिक्षण देत असतो. पण, नालासोपऱ्यामध्ये एका जिम ट्रेनरचा श्वास कोंडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
नालासोपारा पश्चिम, यशवंत गौरव येथील शालिभद्र यश अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या देविदास विनायक जाधव (वय ३५) याला १ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेत घरच्यांनी तसेच बिल्डिंग मधील लोकांनी नालासोपारा येथील रिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.
याबाबत रविवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत विनायक जाधव हे एक जीम ट्रेनर म्हणून काम करत होते. नालासोपारा पश्चिम नाळा डिसिल्वानगर येथील 'द फिटनेस कार्डेस' या जीम मध्ये तरुणांना व्यायामाचे धडे देत होते. एका जिम ट्रेनरचा असा अकाली दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिम भागात ही घटना घडली आहे. देविदास विनायक जाधव (वय ३५) असं मृत ट्रेनरचं नाव आहे. यशवंत गौरव येथील शालिभद्र यश अपार्टमेंटमध्ये ते राहत होते. आज सकाळी अचानक देविदास जाधव यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.