वसईच्या सागरी किनारी पुन्हा सापडला महिलेचा मृतदेह! Saam Tv
मुंबई/पुणे

Nalasopara Crime News: गटारात सापडला महिलेचा मृतदेह; नालासोपारामधील खळबळजनक घटना

पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

जयेश गावंडे

Nalasopara News: नालासोपारा येथून एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एका मोठ्या गटारात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. (Latest Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नालासोपारा (Nalasopara) पूर्व येथील रेल्वे कॅम्पाउंडच्या बाजूला असलेल्या गटारात एका अज्ञात महिलाचा मृतदेह आढळून आला आहे. सकाळी एक सफाई कामगार गटार सफाई करण्यासाठी येथे आला होता. त्यावेळी एक महिला गटरात पडल्याचे दिसले. कोणीतरी महिला गटारात पडली आहे असं समजून तिला वाचवण्यासाठी सफाई कर्मचारी पुढे आला मात्र या महिलेचा मृत्यू झाला होता.

गटरात असेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच सफाई कर्मचारी हादरून गेला. गटारात (Drain) मृतदेह असल्याची माहिती परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. तसेच अनेक व्यक्तींनी हे पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. अशात सफाई कर्मचाऱ्याने तात्काळ पोलिसांना फोन करत सदर माहिती दिली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थाळी धाव घेताली. आचोळे पोलीस घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह गटारातून बाहेर काढला आहे. तसेच तिचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे. सदर महिला नेमकी कोण होती? तिची ओळख अद्याप समोर आलेली नाही, पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशावर येणार अस्मानी संकट; ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान तीन महाभयानक वादळं धडकणार

Hartalika Vrat Niyam: हरतालिका व्रतात काय खावे आणि काय टाळावे? तुम्हाला माहितीये का?

Weight Gain Reasons: डाएट आणि एक्सरसाइज करूनही वजन वाढतंय? 'या' ७ चुका तुमचा प्रयत्न करू शकतात फेल

Central Railway News : दुष्काळात तेरावा महिना! मेगा ब्लॉक सुटल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा ४५ मिनिटे उशिराने

Maharashtra News Live Update: Mumbai: पुण्यात मराठा बिझनेस कम्युनिटीचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो

SCROLL FOR NEXT