Nalasopara Accident Saam TV
मुंबई/पुणे

ट्रॅफिक टाळण्यासाटी बाईक विरुद्ध दिशेला घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं; टॅंकरने जागीच चिरडलं

संतोष भवन परिसरातील मुख्य रस्त्यावर काल मंगळवारी जास्त वाहतूक कोंडी असल्याने अनिलकुमार याने आपली दुचाकी विरुद्ध दिशेने घेतली.

चेतन इंगळे

नालासोपारा: संतोष भवन परिसरातील मुख्य रस्त्यावर मंगळवारी दुचाकी स्लीप झाल्याने टँकरखाली चिरडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत तरुणाच्या दुचाकीच्या पाठीमागे बसलेला तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं आहे. ही घटना घडल्यावर स्थानिकांनी टँकर चालकाला चोप देवून तुळींज पोलिसांच्या (Tulinj Police) ताब्यात दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओस्तवाल नगरीच्या साई निवास चाळीत राहणारा अनिलकुमार राम मनोरथ (१७) आणि त्याचा मित्र राहुल पन्नालाल चव्हाण (१९) हे दोघे दुचाकीवरून जात होते. संतोष भवनच्या पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी पाणी वाहतूक करणाऱ्या भरधांव टँकरच्या खाली त्यांची दुचाकी आल्याने अनिलकुमार या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर त्याच्या गाडीवर पाठीमागे बसलेला मित्र राहुल जखमी झाला आहे.

पाहा व्हिडीओ -

संतोष भवन परिसरातील मुख्य रस्त्यावर काल मंगळवारी जास्त वाहतूक कोंडी असल्याने अनिलकुमार याने आपली दुचाकी विरुद्ध दिशेने आणून टँकरला कट मारण्याचा प्रयत्न केला असता त्याची बाईक स्लीप झाली आणि तो गाडीसहीत टँकरखाल गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचं प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं तर संतप्त स्थानिक नागरिकांनी टँकर चालकाला चोप देऊन पोलिसांच्या (Police) ताब्यात दिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Matoshree : मातोश्रीवर नजर ठेवली जातेय, ठाकरेंच्या नेत्यांचा गंभीर आरोप, तो व्हिडिओ केला पोस्ट

हाफिज सईद पुन्हा भारतावर हल्ल्याच्या तयारीत, बांगलादेशातून...., 'त्या' व्हिडिओमुळे खळबळ

Healthy Chaat: चटकदार अन् कुरकुरीत खाण्याची इच्छा होतेय? जंक फूड सोडा, घरीच तयार करा 'हा' पदार्थ, लहान मुलंही आवडीनं खातील

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, हे काम कराच, अन्यथा ₹ १५०० रूपये होतील

SCROLL FOR NEXT