Nagpur Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Nagpur Crime News: भाचीला घरात एकटं पाहून मामाची नियत फिरली; केलं संतापजनक कृत्य, नागपुरातील घटना

Nagpur Crime: नागपुरात एका नराधम मामानेच आपल्या ४ वर्षीय भाचीवर अत्याचार केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nagpur Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचं प्रमाण सर्वाधिक आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात असताना, नागपूरमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.  (Latest Marathi News)

नागपुरात एका नराधम मामानेच आपल्या ४ वर्षीय भाचीवर अत्याचार केला आहे. ४ वर्षींची भाची मैत्रिणीसोबत घराजवळ खेळत असताना नराधम मामाची नियत फिरली. त्याने घरात कुणी नसल्याचा फायदा घेत चिमुकलीला खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.

कळमना (Nagpur Crime) येथे ही संतापजनक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम मामाला अटक केली आहे. विष्णू (वय २८) असं अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचं नाव आहे.

 पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ३० वर्षांची असून ती कळमना परिसरातच भाजीविक्री करते. दोन वर्षांपूर्वी तिचा नवरा तिला सोडून गेला. ती तिच्या ४ वर्षांच्या मुलीसोबत कळमना परिसरात राहते. ही महिला पहाटे भाजी विकायला जाते आणि तिची मुलगी नातेवाईकांकडे राहते.  (Breaking Marathi News)

नेहमीप्रमाणे १७ एप्रिल रोजी सकाळी ही महिला कामावर गेली. तिची मुलगी तिच्या १० वर्षांच्या चुलत भावासोबत घराजवळ खेळत होती. त्यानंतर आरोपी विष्णूने तेथे पोहोचून मुलाला २० रुपये दिले आणि दुकानात मिठाई घेण्याच्या बहाण्याने पाठवले.

त्यानंतर आरोपीने ४ वर्षीय चिमुकलीला खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. काही वेळाने ती महिला घरी पोहोचली तेव्हा तिला तिची ४ वर्षांची मुलगी वेदनेने विव्हळत असल्याचे दिसले. त्यानंतर महिलेने चिमुरडीकडे विचारपूस केली असता तिने संपूर्ण प्रकार आईला सांगितला.

मुलीवर अत्याचार झाल्याचं लक्षात येताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी पॉक्सोसह विविध कलमान्वये नराधम आरोपी विष्णू भारती याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

Maharashtra Live News Update: चाळीसगाव शहरात वादानंतर एपीआय भरत चौधरी यांची बदली

Satara Tourism : बोटीतून पाहा सह्याद्रीचे सुंदर नजारे, साताऱ्यात आहे 'हे' खास लोकेशन

SCROLL FOR NEXT