nagar agriculture department cancels three krishi seva kendra licence Saam Digital
मुंबई/पुणे

Krishi Seva Kendra: तीन कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द, नगरमध्ये खळबळ

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण साहित्यांची उपलब्धता व्हावी तसेच कमी दर्जाच्या साहित्यामुळे त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून काळजी घेतली जात आहे.

Siddharth Latkar

- सुशिल थाेरात

कृषी विभागाच्या पथकाने तपासणीअंती नगर जिल्ह्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. तसेच तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या धडक कारवाईची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी साम टीव्हीला दिली. (Maharashtra News)

सध्या खरीप हंगामासाठी बाजारामध्ये शेतकऱ्यांची बी- बियाणे आणि खते तसेच इतर कृषी साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण साहित्यांची उपलब्धता व्हावी तसेच कमी दर्जाच्या साहित्यामुळे त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून काळजी घेतली जात आहे.

कृषी विभागाने 15 भरारी पथके नगर जिल्ह्यात कार्यरत ठेवली आहेत. या पथकाने तपासणी केल्यानंतर जिल्ह्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले. तसेच तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे म्हणाले कायमस्वरूपी परवाने रद्द करण्यात आलेल्या दुकानांमध्ये एक बियाणे, एक खते आणि एका कीटकनाशकाच्या दुकानाचा समावेश आहे तर परवाना निलंबित करण्यात आलेल्या दुकानात एक बियाणे विक्री केंद्र आणि दोन खत विक्री केंद्र आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Gochar 2026: सूर्याचं बॅक टू बॅक 3 वेळा संक्रमण; फेब्रुवारी महिन्यात 'या' 5 राशींचं नशीब पालटणार

पालघरमध्ये तारेच्या कुंपणात बिबट्या अडकला, परिसरात भीतीचं वातावरण, VIDEO

Shirdi Sai Baba : शिर्डीत साई बाबांना तब्बल 1 कोटींचा सुवर्ण मुकूट, video

भाजपच्या पाठिंब्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कुणी कोणावर आरोप केले? वाचा

वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत ट्रेनचं तिकीट रद्द करायचंय? जाणून घ्या रेल्वेचे नियम,नाहीतर होईल नुकसान

SCROLL FOR NEXT