Mumbai Crime News SaamTv
मुंबई/पुणे

Crime News: धक्कादायक! प्रियकराच्या मदतीने महिलेने केली स्वतःच्याच घरात चोरी; 'अशी' अडकली पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांनी अत्यंत चलाखीने या घटनेचा तपास केला असून आरोपी प्रियकराचा सध्या शोध सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai: आत्तापर्यंत वेगवेगळ्या चोरीच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. चोरी करण्यासाठी चोरांनी लढवलेल्या क्लुप्यांच्या कथाही ऐकल्या असतील. मात्र मुंबईमध्ये एका विचित्र चोरीची घटना समोर आली आहे. मुंबईच्या कुरारमध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या घरातील तब्बल साडेआठ लाख रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पायल ज्योतीराम शेडगे (३१ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव असून सध्या तिच्या प्रियकराचा शोध घेत आहे. (Latest Marathi News)

याबाबत महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीनुसार, ते मालाड पूर्वेकडील ओमकार एस आर ए सोसायटीमध्ये आपल्या पत्नीसोबत राहत होते. मे २०२२ मध्ये ते आपल्या पत्नीसोबत सांगली या गावी गेले होते. गावावरून मुंबईत परतल्यानंतर आतला दरवाजाचा टाळा तुटल्याचे आढळून आले. तसेच घरातील कपाट उघडून पाहिले असता कपाटातील 3.77 लाखाचे दागिने आणि 4.57 लाखाची रोकड गायब झाल्याचेही लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी या संदर्भात कुरार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून झोन 12 च्या डीसीपी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास करण्यासाठी टीम तैनात केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. या तपासात ही चोरी घरातील व्यक्तीनेच केली असावी असा दाट संशय पोलिसांना होता. त्यामुळेच त्यांनी घरातील सदस्यांचा तपास करण्यास सुरुवात केली.

हा तपास करताना घरातील सर्व व्यक्तींच्या हाताच्या बोटांचे ठसे पोलिसांनी अगोदरच घेतले होते. यानुसार तक्रारदाराच्या पत्नीच्या हाताचे ठसे आणि कपाट आणि त्या ठिकाणी इतर वस्तूंवरील ठसे मिळते जुळते आढळून आल्याने पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली.

या चौकशीमध्ये संबंधित महिलेने आपला गुन्हा कबूल केला. तसेच यामध्ये तिच्या प्रियकरानेही मदत केल्याचे सांगितले. हे दागिने आणि रोकड घेऊन ते दोघेही पळून जाणार होते. तसेच ही चोरी गावी जाण्यापुर्वीच केल्याचेही या महिलेने कबुल केले. (Mumbai)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

SCROLL FOR NEXT