Mumbra Railway Accident Saam tv
मुंबई/पुणे

Mumbra Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघातात मोठी कारवाई, २ इंजिनीअर आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

Mumbai Local: मुंब्रा रेल्वे स्थानकावर भयंकर अपघाताची घटना घडली होती. दोन लोकलमधून पडून ५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. २ इंजिनीअर आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Priya More

Summary -

  • ९ जून रोजी मुंब्रा स्थानकाजवळ भीषण रेल्वे अपघात झाला होता

  • रेल्वे अपघातामध्ये ५ प्रवाशांचा मृत्यू तर ९ जण जखमी झाले होते

  • तपासानंतर दोन इंजिनिअर आणि अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

विकास काटे, ठाणे

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील तीव्र वळणार दोन जलद लोकलमधून पडून ५ प्रवाशांचा मृत्यू तर अन्य काही प्रवासी जखमी झाले होते. ५ महिन्यापूर्वी घडलेल्या या भीषण अपघाताप्रकरणी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वेचे सीनिअर सेक्शन इंजिनिअर, असिस्टंट डिव्हिजनल इंजिनिअर, इतर रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरुद्ध ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ जून रोजी मुंब्रा स्थानकाजवळ ही घटना घडली होती.

पावसामुळे नाला चोकअप होऊन रेल्वे फ्लॅटफॉर्म खचला. मात्र, त्याची वेळेत दुरुस्ती केली नाही. रेल्वे रुळाचे वेल्डिंग न केल्याने तसंच रुळाखालील खडी, लॅशिंग पॅड निघूनही रेल्वेची वेगमर्यादा जास्त ठेवली. रेल्वे रुळाचे मेंटेनन्सचे काम न केल्यास ये-जा करणाऱ्या लोकल एकमेकांच्या जवळ येऊ शकतात आणि अपघात होऊन जीवितहानीआणि वित्तहानी होऊ शकते. याची जाणीव असूनही रेल्वे रुळाचे दुरुस्तीचे काम न केल्याने कसारा-सीएसएमटी आणि सीएसएमटी-कर्जत या दोन गाड्यांचे डबे एकमेकांच्या अतिशय जवळ आले आणि ही दुर्घटना घडल्याचा ठपका आरोपींविरुद्ध ठेवण्यात आला आहे. 

९ जून रोजी ऐन गर्दीच्या वेळी सकाळी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ भीषण रेल्वे अपघात झाला होता. मुंबईकडून कर्जतला आणि कसाऱ्यावरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन जलद लोकलमधून आठ प्रवासी रुळावर पडले. रुळावर पडलेल्या प्रवाशांपैकी ४ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत एकूण ९ जण जखमी झाले होते. जखमीपैकी एका प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ वर गेला होता. ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद झाल्यानंतर या दुर्घटनेचा तपास रेल्वेच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे सोपवण्यात आला.

तसंच, तपासासाठी एक पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने घटनास्थळाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रिकरण प्राप्त केले. साक्षीदारांसह जखमींचे जबाब नोंदवले. या तपासामध्ये सकाळी ९.२ वाजता २ लोकल जात असताना दोन्ही लोकलचे डबे अतिशय जवळ आले. आणि ही दुर्घटना घडली. तसेच, चौकशीत आणखीन धक्कादायक बाबींचा उलगडा झाला आहे. २४ मे, २८ मे, ५ आणि ६ जून रोजी मुंब्रा रेल्वे स्टेशन येथे भरपूर पाऊस पडला. त्यामुळे मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या फ्लॅटफॉर्म क्रमांक ४ लगत असेलला नाला चोकअप झाला आणि रेल्वे रुळ क्रमांक ३ आणि ४ च्या रुळावर पाणी साचले. रुळाखालील खडीही वाहून गेली होती. फ्लॅटफॉर्म आणि रेल्वे रुळाखालील जमीन धसली. ५ जून रोजी मुंब्रा रेल्वे स्टेशन किमी नंबर ४०/३०० ते ४०/०० दरम्यान रेल्वे रुळ क्रमांक ४ चे रुळ बदली करण्यात आले. पण वेल्डिंग केली नाही.

या तपासाबरोबरच नेमका हा अपघात कशामुळे झाला याविषयी रेल्वे पोलिसांनी व्हिजेटीआयकडून अभिप्राय मागवला होता. व्हिजेटीआयचा अहवाल आणि तपासाअंती या दुर्घटनेचा संपूर्ण उलगडा झाल्यानंतर रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर शनिवारी रात्री समर यादव, विशाल डोळस आणि इतर रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुद्ध बीएनएस कलम १०५, १२५ (अ), १२५ (ब), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप कोणालाही अटक झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: धाड धाड गोळ्या झाडल्या, आणखी एका कबड्डीपटूची हत्या, आठवडाभरातील दुसरी घटना

Korlai Fort History: रायगडातील 'या' किल्ल्यावर आहे 'चर्च'; इतिहास माहितीये का?

Maharashtra Live News Update: नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्याची कुंभमेळामंत्री गिरीश महाजन करणार पाहणी

Accident News : मुंबईहून पुण्याला जाताना तरुणाचा भीषण अपघात; घाटात तोल गेला, १०० फूट दरीत कोसळून मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹४५०० रुपये खटाखट येणार? ३ महिन्याचा हप्ता एकत्र देणार; कारण काय?

SCROLL FOR NEXT