ACB BOOKS PUNE REVENUE OFFICER FOR ALLEGEDLY DEMANDING RS 1 LAKH BRIBE IN LAND PERMISSION CASE Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा फसला जाळ्यात

Mumbai Bribe News : मुंबईतील आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला ५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. बसवरील दंड कमी करण्यासाठी लाचेची मागणी केली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल.

Alisha Khedekar

  • वरिष्ठ लिपिकाला एसीबीने लाच घेताना रंगेहात पकडले

  • तक्रारदाराच्या बसवरील दंड कमी करण्यासाठी लाच मागितली

  • आरोपीविरोधात गुन्हा दाखल

  • आरटीओ कार्यालयात खळबळ

Mumbai Bandra RTO Bribe Case News मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरातील प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) कार्यालयातील एका वरिष्ठ लिपिकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडलं आहे. या कारवाईमुळे आरटीओ कार्यालयात एकच खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मालकीच्या बसवर वांद्रे प्रादेशिक परिवहन विभागाने २६ हजार ५०० रुपयांचा दंड आकारला होता. हा दंड कमी करून देण्यासाठी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मिथुन विलास आडे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. सुरुवातीला त्यांनी ५ हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र नंतर ही रक्कम ५ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.

दरम्यान, तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. वरळी येथील एसीबी (ACB) कार्यालयात त्यांनी याबाबत तक्रार नोंदवली. तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी माहितीची सत्यता पडताळण्यासाठी जाळं टाकलं. प्लॅनिंगनुसार एसीबीची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि संबंधित अधिकारी जाळ्यात अडकला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने आरोपी वरिष्ठ लिपिक मिथुन आडे (RTO Clerk Mithun Aade) यांना ४ हजार रुपयांची रक्कम दिली. ही रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.

या प्रकरणी मिथुन विलास आडे याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आणखी काही बाबी समोर येतात का, याची चौकशी केली जात आहे. सरकारी कार्यालयांमध्ये लाचेच्या मागण्या आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी वारंवार समोर येत असताना एसीबीने केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शासकीय यंत्रणांमधील पारदर्शकता आणि जबाबदारीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जेजुरीत भाविकांना भंडारा घेण्यासाठी सक्ती कराल तर खंडणी समजली जाईल, पोलिसांचा व्यापाऱ्यांना इशारा

यंदा पावसाळ्यात लांब कुठेच नको! मुंबईपासून जवळ असलेल्या 'या' 5 सुंदर ठिकाणांना द्या भेट; कमी खर्चात येईल भारी मज्जा

Accident : पुणे-सातारा महामार्गावर भयंकर अपघात, २ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा

Morning Body Pain: रोज सकाळी शरीर दुखतंय? हलक्यात घेऊ नका; 'या' गंभीर आजारांची असू शकतात लक्षणं

Diabetes : रक्तातील शुगर अचानक वाढणार नाही, साखरेला पर्याय म्हणून वापरा 'हे' ५ पदार्थ

SCROLL FOR NEXT