Mumbai Fire news  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire : मुंबईत एकाच दिवशी दोन ठिकाणी आग; इमारतीमधील नागरिकांची पळापळ

Mumbai Fire news : मुंबईत एकाच दिवशी दोन ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर इमारतमधील नागरिकांची एकच पळापळ झाली.

Saam Tv

मुंबई आणि भिवंडीत एकूण तीन आगीच्या घटना

मुंबईच्या घाटकोपर आणि कांदिवलीत दोन ठिकाणी इमारतीला आग

आग लागल्याने नागरिकांची एकच धावाधाव

मयूर राणे, संजय गडदे, फैय्याज शेख

मुंबईत आग लागण्याच्या घटना सुरूच आहे. मुंबईत आज बुधवारी दिवसभरात दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. घाटकोपर आणि कांदिवली या दोन्ही ठिकाणी तासाभराच्या अंतराने आगीच्या घटना घडल्या. दोन्ही ठिकाणी इमारतीमध्ये आग लागली आहे. आग लागल्यानंतर इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली. आग लागल्याने इमारतीमधील नागरिकांची पळापळ झाली.

घाटकोपरमध्ये इमारतीला भीषण आग

घाटकोपरमध्ये अमृतनगर विभागात असलेल्या न्यू वसंत व्हिला या इमारतीला भीषण आग लागली. तीन मजली असलेल्या या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे.

कांदिवलीत २३ मजली इमारतीला आग

कांदिवली पूर्व येथील ठाकूर व्हिलेजमधील गुरुकुल टॉवरच्या २३व्या मजल्यावर आज बुधवारी अचानक आग लागली. घटना समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आता घटनास्थळी अधिकाऱ्यांकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. VV

रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. परिसरात भीतीचे वातावरण असून अग्निशमन दल परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

भिवंडीत धावत्या ट्रकला लागली अचानक आग

ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर वडपे गावाच्या हद्दीत धावत्या ट्रकला अचानक आग लागण्याची घटना घडली. ट्रक भाजीपाल्याचे रिकामे प्लास्टिक कॅरेट घेऊन कल्याणहून मध्यप्रदेशला जात होता. ट्रकमध्ये ठेवलेल्या प्लास्टिक कॅरेटने पेट घेतल्याने ही आग पसरली होती.

ट्रकला आग लागण्याची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने जेसीबीच्या साह्याने माती टाकून आग विझविण्यात स्थानिकांना यश आलं. या आगीत ट्रकचा पाठीमागील भाग जळाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आग लागण्याचे कारण अस्पष्ट आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची होणार भेट

Actress On Mandar Devsthali: 'एखाद्याचा डाऊनफॉल...'; शशांकच्या आरोपांनंतर मंदार देवस्थळींच्या मदतीला आली 'ही' मराठी अभिनेत्री

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार, अख्खा पक्षच शिवसेनेत विलीन होणार, दिग्गज नेत्याची घोषणा

मोठी बातमी : UPSC नियमात मोठा बदल; IAS-IFS ला पुन्हा परीक्षा देता येणार नाही, IPS चा हा पर्याय बंद

Kidney Disease: डोळ्यांमध्ये ही लक्षणं दिसली तर समजा किडनी होतेय निकामी; तज्ज्ञांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT