White stripes painted on roads near Shivtirth in Dadar spark controversy and political reactions in Mumbai. saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत सांस्कृतिक दहशतवादाच्या 'पट्ट्या', जैनांच्या 'पांढऱ्या पट्टी'वरून पुन्हा वाद पेटला, 'पांढऱी पट्टी' आता दादरच्या 'शिवतीर्थ'च्या दारात

Mumbai White Lines Row Jain Marathi Conflict Dadar: मुंबईत पुन्हा जैन विरूद्ध मराठी वाद पेटलाय.... सोसायट्यांमध्ये लावण्यात येणाऱ्या पांढऱ्या पट्ट्या आता थेट मुंबईच्या रस्त्यांवर लावण्यात येत आहेत. विशेष म्हणजे दादरच्या राज ठाकरेंच्या शिवतीर्थाच्या अंगणात या पांढऱ्या पट्ट्या येऊन ठेपल्या आहेत. काय आहे हा पांढऱ्या पट्ट्यांचा प्रकार आणि यावरून दादरमध्ये का वाद झालाय? पाहूयात हा रिपोर्ट........

Suprim Maskar

मुंबईत पुन्हा जैन विरुद्ध मराठी अशा वादाची ठिणगी पडलीय.... आणि त्याला कारण ठरलयं... जैन समाजाकडून अवैधरित्या ठिकाठिकाणी मारल्या जाणाऱ्या पांढऱ्या पट्ट्या....रिलस्टार प्रसाद वेदपाठकनं घाटकोपरमधील पांढऱ्या पट्टीचा मुद्दा ऐरणीवर आणल्यानंतर आता थेट रस्त्यांवरच या पट्ट्या मारल्याचं समोर आलंय. दादरमध्ये राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थाना जवळील मारलेल्या या पांढऱ्या पट्टीवरून गदारोळ माजलाय...स्थानिकांनी या पांढऱ्या पट्ट्यांना विरोध करत थेट आक्रमक पवित्रा घेतला...

मुळात जैन समाज हा नेहमीच शांतीप्रिय समाज म्हणून ओळखला जातो. 'अहिंसा परमो धर्म' या शिकवणीचा सर्वाधिक प्रसार आणि आचरण याच धर्मानं केला...मात्र ज्यावेळी स्थानिक रहिवाश्यांनी पांढऱ्या पट्ट्यांना आक्षेप घेतला तेव्हा जैन मुनींनी महिलांशीच हुज्जत घालण्याचा आणि उद्धट बोलण्याचा असंस्कृतपणा दाखवला...पाहा नेमका काय प्रकार घडला...

दरम्यान उन्हामुळे जैन धर्मगुरू आणि साध्वींना चालताना त्रास होऊ नये, म्हणून या पट्ट्या मारल्याचा युक्तीवादही घाटकोपरच्या प्रकरणानंतर समोर आलाय..मात्र दादरमधील या प्रकरणानंतर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला.... मुस्लिम समाजाच्या नमाजला विरोध करणारे जैनांच्या या सांस्कृतिक दहशतवादावर गप्प का? असा सवाल संदीप देशपांडेंनी उपस्थित केला... तर आताच या गोष्टीचा ऊत का आला? असा सवाल करत बीएमसीच्या विरोधी पक्षपक्षनेत्या किशोर पेडणेकरांनी नाव न घेता भाजपवर निशाणा साधलाय.

दरम्यान मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर दादरमधील या पांढऱ्या पट्ट्य़ा पालिकेकडून हटवण्यात आल्या...मात्र कधी सोसायटीत मांसाहाराला विरोध, कधी कबुतरखान्याचा मुद्दा आणि आता थेट रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्या...यामुळे असे प्रकार वारंवार आताच का घड़तायत....जैन बांधव अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात स्थायिक असताना आताच वांरवार धार्मिक संघर्षाला खतपाणी कोण घालतयं? जैन समाजाच्या नावाने राजकारण करण्याचा खोडसाळपणा कोण करतंय? याचं आत्मपरिक्षण स्वत: जैन समाजानं करायला हवं....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: विवाहित महिलेनं आधी स्वत:नं विष प्राशन केलं, नंतर ४ मुलांनाही पाजलं; रायगडमधील धक्कादायक घटना

सर्व 9 खासदार येणार की काही पाठ फिरवणार? राज्यात पुन्हा होणार ऑपरेशन टायगर?

Maharashtra News Live Update: राज्यातील विविध शहरानंतर आता एफडीएची पुण्यात देखील धाड

कल्याणमध्ये बुद्धभूमीवरून रणसंग्राम; १५ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन

22 वर्षीय महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू; कुटुंबीय, नातेवाईकांचा गोंधळ, मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवला

SCROLL FOR NEXT