Mumbai Water Storage Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Storage: मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट; भातसा तलावात फक्त २२ टक्के पाणीसाठा शिल्लक, जलसाठ्यात होतेय वेगाने घट

Rohini Gudaghe

गिरीश कांबळे, साम टीव्ही मुंबई

मुंबईवर सध्या पाणीसंकट घोंघावताना दिसत आहे. मुंबईला एकूण सात तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. या तलावांपैकी सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या भातसा आणि अप्पर वैतरणा तलावाची आहे. या तलावांच्या पाणीपातळीत घसरण झाली आहे. मागील वर्षी पावसाच्या कमतरतेने पाणीसाठा कमी झाला आहे.

सध्या पाणीसाठ्याची स्थिती काय?

भातसामध्ये शून्य टक्के, तर अप्पर वैतरणात शून्य टक्के, तानसा तलावात २२ टक्के, तुलसी २४ टक्के, मोडक सागर १५ टक्के पाणीसाठा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत पाणी पातळीची घसरण (Mumbai Water Storage) झालीय. मुंबईतील सात तलावात एकूण ५.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

भातसा धरणातील पाण्याची पातळी

या तलावांची पाणी साठवणक्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. या तलावांतून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो. मुंबईतील सात तलावांतील उपलब्ध पाणीसाठा आणि अतिरिक्त पाणीसाठ्याचा आढावा, या आठवड्याच्या अखेरीस घेण्यात येणार (Mumbai Water Supply) आहे.

मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट

मुंबई महापालिकेसह ठाणे भिवंडी महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणामध्ये २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबल्याने मुंबईसह इतर महापालिकेंना २४ तास पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची पाण्याची पातळी खालवली ( Mumbai Water Crisis) आहे. धरणात फक्त २२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला (Bhatsa Dam Water Shortage) आहे. पुढील आठ दिवस पाऊस पडला नाही, तर भातसा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा फोर्स कमी करण्यात येणार आहे. मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवले जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT