mumbai news  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Supply News: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात पाणीपुरवठा २४ तास बंद

Mumbaikars use water carefully: ‘एम पूर्व’ आणि ‘एम पश्चिम’ विभागातील अनेक भागांमध्ये पाणी येणार नसल्याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि पाण्यााच जपून वापर करावा

Priya More

Water Cut In Mumbai:

मुंबईकरांसाठी (Mumbaikar) महत्वाची बातमी आहे. मुंबईकरांना येत्या २४ आणि २५ ऑगस्ट रोजी पाण्याचा जपून वापर करावा. कारण मुंबईतल्या अनेक भागांमध्ये या दिवशी २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलाशयाच्‍या दुरूस्‍ती कामानंतर तांत्रिक कारणास्‍तव हा पाणीपुरवठा बंद (Water Cut In Mumbai) राहणार आहे. ‘एम पूर्व’ आणि ‘एम पश्चिम’ विभागातील अनेक भागांमध्ये पाणी येणार नसल्याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि पाण्यााच जपून वापर करावा असे आवाहन मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) करण्यात आले आहे.

मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ट्रॉम्बे उच्च स्तरीय जलाशयातील कप्पा क्रमांक १ आणि २ ची दुरुस्ती कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे झाल्यानंतर ‘कप्पा क्रमांक १’ मध्ये इनलेटद्वारे (१८०० मिमी) पाणी भरणा करण्याचे काम गुरुवारी २४ ऑगस्ट २०२३ ते शुक्रवार २५ ऑगस्ट २०२३ रोजी हाती घेण्यात येणार आहे. या अनुषंगाने संबंधित तांत्रिक बाबींच्या गरजेनुसार ‘एम पूर्व’ आणि ‘एम पश्चिम’ विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा गुरुवार २४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० ते शुक्रवार २५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत बंद राहील.

‘एम पूर्व’ विभागातील या परिसरातील पाणीपुरवठा राहणार बंद -

रफिक नगर, बाबा नगर, आदर्श नगर, संजय नगर, निरंकार नगर, मंडाळा, २० फिट व ३० फिट रोड, एकता नगर, म्हाडा इमारती, शिवाजी नगर रोड क्रमांक ०१ ते ०६, बैंगणवाडी रोड क्रमांक ०७ ते १५, कमला रमण, रमण मामा नगर, अहिल्यादेवी होळकर मार्ग, गौतम नगर, लोटस वसाहत, नटवर पारेख कंपाऊंड, शंकरा वसाहत, इंडियन ऑइल नगर विभाग, टाटानगर, गोवंडी स्टेशन रोड, देवनार मनपा कॉलनी, गोवंडी, लल्लूभाई इमारती, जे. जे. रोड (ए, बी, आय, एफ सेक्टर), सी, डी, ई, जी, एच, जे, के सेक्टर, चिता कॅम्प, कोळीवाडा, पायलीपाडा.

तसंच, ट्रॉम्बे, कस्टम रोड, दत्ता नगर, बालाजी मंदिर रोड, एस. पी. पी. एल. इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर, देवनार फार्म रोड, देवनार व्हिलेज रोड, गोवंडी गाव, व्ही. एन. पुरव मार्ग, बी. के. एस .डी. मार्ग जवळील भाग, टेलिकॉम फॅक्टरी, बी. ए. आर. सी. नेव्हल डॉकयार्ड, मानखुर्द, मंडाळा गाव, डिफेन्स एरिया, मानखुर्द व्हिलेज, बोरबादेवी, घाटला, बी. ए. आर. सी. फॅक्टरी, बी. ए. आर. सी. वसाहत, गौतम नगर, पांजरपोळ या परिसरांमधील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे

‘एम पश्चिम’ विभागातील या परिसरातील पाणीपुरवठा राहणार बंद -

पी. एल. लोखंडे मार्ग, शांता जोग मार्ग, पी. वाय. थोरात मार्ग, छेडानगर, श्रीनगर सोसायटी, मुकुंदनगर, एस. टी. रोड, हेमू कलाणी मार्ग, सी. जी. गिडवाणी मार्ग, चेंबूर, इंदिरा नगर, चेंबूर मार्केट, चेंबूर नाका, शेल कॉलनी रोड, एन. जी. आचार्य मार्ग, उमर्शी बाप्पा चौक, घाटला, अमर नगर, मोतीबाग, खारदेव नगर, वैभव नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ वसाहत, लाल डोंगर, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क, लालवाडी, मैत्री पार्क, आतुर पार्क, सुमन नगर, साईबाबा नगर, श्यामजीवी नगर या परिसरांमधील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

‘एम पूर्व’ आणि ‘एम पश्चिम’ विभागातील ज्या परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे त्या ठिकाणच्या नागरिकांनी याची नोंद घ्यावी. या परिसरातील नागरिकांनी आदल्या दिवशी म्हणजेच २३ ऑगस्ट रोजी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, पाणीपुरवठा बंद असण्याच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT