Kolhapur Mahapalika New Commissioner : कोल्हापूर महापालिकेला अडीच महिन्यांनी मिळाले आयुक्त, मंजू लक्ष्मी यांची नियुक्ती

Kolhapur News : आयुक्त नसताना आणि महानगरपालिकेत सध्या अडीच वर्षापूर्वी नगरसेवकांची मुदत संपल्यामुळे प्रशासकीय कामकाज सुरू आहे.
Kolhapur Mahapalika New Commissioner
Kolhapur Mahapalika New CommissionerSaa, TV
Published On

रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापूर महापालिकेचे आयुक्तपद मागील अडीच महिन्यांपासून रिक्त होते. अखेर अडीच महिन्यानंतर कोल्हापूर महापालिकेला आयुक्त मिळाले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंजू लक्ष्मी यांची नियुक्ती झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरकरांना 15 ऑगस्ट रोजी दिलेला शब्द पाळला आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेला आयुक्त नसल्याने विनायुक्त अडीच महिने कारभार सुरू होता. कादंबरी बलकवडे यांची बदली झाल्यामुळे ही जागा रिक्त होती. आयुक्त नसताना आणि महानगरपालिकेत सध्या अडीच वर्षापूर्वी नगरसेवकांची मुदत संपल्यामुळे प्रशासकीय कामकाज सुरू आहे. त्यामुळे कोल्हापुरात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या.  (Maharasthra News)

Kolhapur Mahapalika New Commissioner
Sharad Pawar-Eknath Shinde : 'तुम्ही १० वर्ष कृषिमंत्री होते...', CM एकनाथ शिंदेंची शरद पवारांवर टीका

कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. अपुरा पाणीपुरवठा, स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले आहेत. राज्यात भाजप आणि शिंदे सरकारचं राज्य असताना भाजपच्या नेतेमंडळींनी कोल्हापूरला आयुक्त देण्यासंदर्भात अनेक वेळा विनंती केली होती. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी कोल्हापूरला लवकरच आयुक्त देण्याची घोषणा केली होती. अखेर आज मंजू लक्ष्मी या आयुक्त कोल्हापूरला मिळाल्या आहेत. (Latest Marathi News)

कोल्हापूर महानगरपालिकेस आयुक्त मिळाल्याची माहिती व्हॉट्सअॅप वरून मिळाली. पण ऑर्डर बघितल्यावर खात्री पटली. कारण गेले अनेक दिवस आयुक्त नेमणुकीच्या केवळ अफवाच येत होत्या. निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान, असे ब्रीद असणाऱ्या सरकारकडून ९० दिवसांनंतर का असेना पण कोल्हापूर महानगरपालिकेस आयुक्त देण्यासाठी सवड मिळाली, याबद्दल राज्य सरकारचे हार्दिक आभार, अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com