दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज हे नेहमीच त्यांच्या आभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतात. चित्रपटाप्रमाणेच ते त्यांच्या पडखर भूमिकेसाठी ओळखले जातात. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर चांद्रयान ३ (Chandrayaan-3) संबधित पोस्ट शेअर केली होती. आता त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी चंद्राचे काही फोटो इस्त्रोने जारी केले होते. त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी इस्त्रोच्या माजी प्रमुखांची खिल्ली उडवली होती. त्यामुळेच आता त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.
प्रकाश राज यांनी इस्त्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचे व्यंगचित्र शेअर केले होते. ज्यामध्ये ते शर्ट आणि लुंगी घालून चहा ओतताना दिसत आहे. 'ब्रेक्रिंग न्यूज चंद्रावरचा पहिला फोटो आपल्या भेटीला #विक्रमलँडर' असं कॅप्शन लिहल आहे.
त्यांच्या या पोस्टविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आहे. हिंदू संघटनेच्या नेत्यांनी ही तक्रार केली आहे. हिंदू संघटनेच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
प्रकाश राज यांनी केलेल्या या ट्विटमुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एका युजरने लिहलं आहे की, तुम्ही इथेच जेवता आणि इथलाच वाईट विचार करता? तर आणखी एका यूजरने लिहिले की, 'चांद्रयान-3 ही अशी गोष्ट आहे की, राजकीय विचारसरणीची पर्वा न करता संपूर्ण भारताला अभिमान वाटावा. राजकीय विरुद्ध राष्ट्रीय ट्रोलिंगमधील भान असू द्या. तर अनेकांनी त्यांनी देशद्रोहीदेखील म्हटले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.