Mumbai 7 dam Water Stock Update News  AI Image
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात ३४५ दिवस पुरेल इतकेच पाणी, कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा? जाणून घ्या

Mumbai Water Storage Update News : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये ९८.११ टक्के पाणीसाठा असून पुढील ३४५ दिवस पुरेल इतके पाणी उपलब्ध आहे. भातसा, विहार आणि तुळशी तलाव १०० टक्के भरले आहेत.

Alisha Khedekar

  • मुंबईच्या ७ प्रमुख तलावांमध्ये ९८.११% पाणीसाठा उपलब्ध

  • सध्याचा साठा सुमारे ३४५ दिवस पुरेल इतका असल्याचे नमूद

  • भातसा, विहार आणि तुळशी तलाव १००% भरलेले

  • यंदाचा एकूण साठा मागील वर्षीच्या तुलनेत किंचित कमी

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे सात प्रमुख तलाव भरली आहेत. पुढील ३४५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा सध्या उपलब्ध असून मोडक सागर या धरणामध्ये पाणीसाठा १३ टक्क्यांनी घटला आहे. आज या सातही तलावांमध्ये एकूण १४,१९९७४ ML इतका पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, हा साठा एकूण ९८.११ टक्के इतका आहे.

यंदाचा पाणीसाठा किंचित कमी

गेल्या वर्षीच्या तुलनेत या कालावधीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा किंचित कमी आहे. २०२५ मध्ये २२ सप्टेंबरच्या आसपास तलावांमध्ये ९९.२९ टक्के पाणीसाठा होता. तर २०२४ मध्ये याच काळात ९८.१५ टक्के साठा नोंदवण्यात आला होता. यंदा राज्यात एल निनोच्या महाभयंकर प्रभावामुळे पावसाला उशिराने सुरुवात झाली, तर तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला. परिणामी पाऊस कमी पडल्याने पाण्याच्या पातळीत काहीशी घट झाल्याचे जाणवत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी भातसा, विहार आणि तुळशी तलाव १०० टक्के भरलेले आहेत. विहार आणि तुळशी तलावातून अद्यापही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे, मोडक सागरमध्ये सर्वात कमी म्हणजे ८८.८० टक्के पाणीसाठा आहे.

कोणत्या तलावात किती पाणीसाठा?

भातसा तलावाची स्थिती पाहता, तलावाची पाणीपातळी १४२.०७ मीटर असून त्यात ७,१७,०३७ ML पाणीसाठा आहे. गेल्या २४ तासांत येथे २ मिमी पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामातील एकूण पाऊस २,६८९ मिमी झाला आहे. विहार तलाव १०० टक्के भरलेला असून त्याची पाणीपातळी ८०.२२ मीटर आहे. गेल्या २४ तासांत १२ मिमी पाऊस झाला आहे. या तलावातून ७ जुलैपासून पाण्याचा ओव्हरफ्लो सुरू आहे. तुळशी तलावाची पाणीपातळी १३९.२३ मीटर असून येथे ६१ मिमी पावसाची नोंद झाली. तुळशी तलावही ७ जुलैपासून ओसंडून वाहत आहे.

मोडक सागरच्या पाणीसाठ्यात घट

मोडक सागरमध्ये १,१४,४८२ ML पाणीसाठा असून तो ८८.८० टक्के आहे. गेल्या २४ तासांत तलावाची पाणीपातळी ०.३१ मीटरने वाढली. दरम्यान, अप्पर वैतरणामध्ये ९६.१८ टक्के, तर वैतरणामध्ये ९८.९६ टक्के पाणीसाठा आहे. तानसा तलावात ९८.४५ टक्के साठा असून तिन्ही तलावांमध्ये मिळून ६,६७,१९३ ML पाणी उपलब्ध आहे. एकूणच, मुंबईच्या सातही तलावांमध्ये ९८ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने सध्याची स्थिती समाधानकारक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील सफाई कामगार आक्रमक

Satara Earthquake: साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का, घाबरून नागरिक घराबाहेर पळाले

Heart blockage percentage: रिपोर्टमध्ये 70-80% ब्लॉकेज दिसले म्हणजे हार्ट अटॅक येणार? हृदयात किती टक्के ब्लॉकेज धोकादायक?

Shivsena: शिवसेना पक्ष अन् चिन्ह कुणाचे? सुप्रीम कोर्टात आज महत्वाची सुनावणी

SIM Card: सिम कार्ड दुसऱ्याला देणं पडेल महागात, ५० लाखांचा दंड अन् ३ वर्षांचा तुरुंगवास

SCROLL FOR NEXT