Mumbai Water Cut News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Water Supply : मुंबईतील 'या' भागातील पाणीपुरवठा तब्बल १६ तासांसाठी राहणार बंद; नागरिकांचा होणार खोळंबा

Mumbai Water Cut News : मुंबईकरांचा मोठा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण, या भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

Satish Daud

मुंबई महापालिकेतर्फे सध्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. येत्या २९ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून ३० मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत तब्बल १६ तासांसाठी अंधेरी आणि आसपासच्या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे. तसेच पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. अंधेरी परिसरात दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे व जुनी नादुरुस्त जलवाहिनी काढून टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत.

बुधवार २९ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून या कामाची सुरुवात केली जाणार आहे. दुसऱ्या दिवशी ३० मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत हे काम केले जाणार आहे. या १६ तासांच्या कालावधीत अंधेरी आणि आसपासच्या परिसरातील पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

संबंधित कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असं महापालिकेने स्पष्ट केलं आहे. या कामामुळे वेरावली जलाशयची पाण्याची पातळी सुधारेल आणि अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्ले या भागांचा पाणीपुरवठ्यात कायमस्वरुपी सुधारणा होणार आहे.

अंधेरीत कोणत्या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद?

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीतील के पूर्व विभागातील सर्व परिसर, पी दक्षिण विभागातील सर्व परिसर आणि के पश्चिम विभागातील –सी. डी. बर्फीवाला मार्ग, संपूर्ण जुहू परिसरासह गिल्बर्ट हिल झोन – के पश्चिम ६ या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

Pune : पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात, फटाक्यांची दुकानं २४ तास खुली राहणार

शिक्षक की सावकार? गुरुजी आयटीच्या रडारवर, हजारो शिक्षकांची 'ITR'मधील चलाखी

मुंबईकरांसाठी महसूल विभागाची दिवाळी भेट, नेमका काय घेतला निर्णय?

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाची चिन्हं! हवामान खात्याचा ११ जिल्ह्यांना इशारा

SCROLL FOR NEXT