Mumbai Dam Water Level Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Water Crisis: मुंबईवर पाणी कपातीची टांगती तलवार, सातही धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट; किती टक्के पाणीसाठा शिल्लक?

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट आहे. पाणी कपातीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी देखील माहिती समोर आली आहे.

Priya More

राज्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. आधी उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांवर आता पाणी टंचाईचे संकट आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मे महिना सुरूच होताच तीव्र पाणी टंचाईच्या झळा लागण्यास सुरूवात झाली आहे. राज्यातील सर्वच धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. महत्वाचे म्हणजे मुंबईवर देखील पाणीकपातीची टांगती तलवार आहे. कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीबाणीचा सामना करावा लागू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा २३ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे मुंबईत पाणी कपात केली जाऊ शकते. पण अद्याप मुंबई महानगर पालिकेने याबाबत काही निर्णय घेतला नाही. पण येत्या १५ मेपर्यंत सर्व धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

मुंबईला तानसा, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या ५ धरणांमधून तर तुळशी आणि विहार या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. मुंबई शहराला या सातही जलाशयांमधून दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सातही जलाशयामधून वर्षभर पाणी पुरवठा करण्यासाठी १४, ४७,३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. पण यावर्षी या सातही जलाशयांमध्ये ४,११,३५५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये कमी पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने राज्य सरकारकडे अतिरिक्त पाण्यासाठी मागणी केली आहे. सरकारने २,३०,५०० दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा देण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. ज्यात भातसा आणि अप्पर वैतरणातून हा साठा घेण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : ५ राशींच्या लोकांच्या संसारात वाढणार गोडी गुलाबी; तर काहींचे होणार मतभेद, वाचा सोमवारचं राशीभविष्य

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

SCROLL FOR NEXT