Kaali Peeli Taxi Saamtv
मुंबई/पुणे

Kaali Peeli Taxi: ६ दशकांच्या प्रवासाला कायमचा ब्रेक; मुंबईच्या रस्त्यांवरुन काळी - पिवळी 'पद्मिनी टॅक्सी' होणार गायब

Mumbai News: ६० वर्षांपासून मुंबईच्या रस्त्यांवर दिमाखात धावणारी पद्मिनी टॅक्सी आता कायमची बंद होणार आहे.

Gangappa Pujari

NO More Kali Pili In Mumbai:

गेल्या ६० वर्षांपासून मुंबईच्या रस्त्यांवर दिमाखात धावणारी पद्मिनी टॅक्सी आता कायमची बंद होणार आहे. मुंबईकरांची खास काली- पिली म्हणून ओळखल्या जाणारी ही टॅक्सी सोमवार (३०, ऑक्टोंबर) मुंबईमध्ये ही पद्मिनी टॅक्सी अधिकृतपणे चालवता येणार नाही. याबाबतची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच मुंबईतील जुनी डबल डेकर बस सेवेतून निवृत्त झाली होती. त्यानंतर आता काळी पिवळी 'पद्मिनी टॅक्सी'सुद्धा मुंबईच्या रस्त्यावरुन गायब होणार आहे. नवे मॉडेल्स आणि अॅपमुळे ही काळी-पिवळी टॅक्सी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नव्या मॉडेलच्या काळ्या पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरुन धावताना दिसणार आहेत.

याबाबत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवटची 'प्रीमियर पद्मिनी' 29 ऑक्टोबर 2003 रोजी ताडदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंद झाली होती. तसेच या टॅक्सीचे उत्पादनही 2001 साली बंद करण्यात आले आहे.

मुंबईकरांच्या आयुष्यात होते मानाचे स्थान...

मुंबईच्या रस्त्यांवर गेल्या ६० वर्षांपासून ही पद्मिनी टॅक्सी दिमाखात धावत होते. ९० च्या दशकातील अनेक हिंदी चित्रपटांमध्येही या टॅक्सीने मानाचे स्थान मिळवले होते. दरम्यान, काही वर्षांपूर्वी मुंबई टॅक्सिमॅन संघटनेने किमान एक काली- पिली टॅक्सी जतन करण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र त्यांची ही याचिका फेटाळून लावली गेली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई नाशिकमध्ये दाखल

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

SCROLL FOR NEXT