Mumbai University :  Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai University : पारसी- झोरास्ट्रीयन संस्कृतीवर होणार मुंबई विद्यापीठात अभ्यास, अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाशी सामंजस्य करार

Mumbai University News : प्राचीन, समृद्ध आणि वैभवशाली पारसी-झोरास्ट्रीयन संस्कृतीच्या अध्ययन व संशोधनासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात अवेस्ता पहलवी अभ्यास केंद्राची स्थापना केली जाणार आहे.

Sandeep Gawade

Mumbai University

प्राचीन, समृद्ध आणि वैभवशाली पारसी-झोरास्ट्रीयन संस्कृतीच्या अध्ययन व संशोधनासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात अवेस्ता पहलवी अभ्यास केंद्राची स्थापना केली जाणार आहे. स्कूल ऑफ लँग्वेजेसच्या माध्यमातून हे अभ्यास केंद्र सुरू होणार आहे. या अनुषंगाने आज नवी दिल्लीत मुंबई विद्यापीठ आणि अल्पसंख्याक कार्य मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार केला आहे.

पारसी धर्मग्रंथ, अभिजात साहित्य, समुदाय, झोरास्ट्रीयन संस्कृती आणि आध्यात्मिक अशा आनुषंगिक विषयांचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी या अभ्यास केंद्राचे महत्त्व अधोरेखित होणार आहे. मुंबई विद्यापीठात १,८८८ पासून अवेस्ता पहलवी यावर अभ्यास केला जात आहे. आता नव्याने या अभ्यास केंद्राची स्थापना होणार आहे. पदविका, प्रमाणपत्र, पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन अशी या अभ्यासाची व्याप्ती वाढवली जाणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने भारतीय भाषांचे जतन, संवर्धन, प्रचार आणि प्रसार यास अनुसरून मुंबई विद्यापीठात संस्कृत, पाली, पर्शियन भाषांच्या अनुषंगानेच आता अवेस्ता पहलवी भाषा आणि संस्कृतीवर अभ्यास केला जाणार आहे. वैश्विकस्तरावर भारतीय संस्कृतीचा प्रचार, पारसी संस्कृती आणि भारतीय सांस्कृतिक परंपरा आणि आंतरराष्ट्रीय सहयोगाला प्रोत्साहन देण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून मुंबई विद्यापीठात या केंद्राची स्थापना केली जात असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

१२ कोटींचा निधी उपलब्ध

अभ्यास केंद्राच्या माध्यमातून अवेस्ता पहलवीच्या समृद्ध वारशाचे जतन आणि संवर्धन, झोरास्ट्रीयन संस्कृती, भारताच्या विकासात पारसी समुदायाचे योगदान, भाषिक वैशिष्ट्यांचे दस्तऐवजीकरण आणि अवेस्ता पहलवीचे भारतीय सांस्कृतिक विविधतेतील योगदान अशा आनुषंगिक विषयांचे सखोल अध्ययन या केंद्राच्या माध्यमातून केले जाणार असल्याचेही कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. या केंद्राच्या स्थापनेसाठी केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाचे सुमारे १२ कोटींचे आर्थिक पाठबळ लाभले आहे. या निधीतून या अभ्यास केंद्रासाठी लँग्वेज लॅब, मल्टीमीडिया स्टुडिओ आणि आनुषंगिक पायाभूत सुविधा तयार केल्या जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यापुढे बोलताना काळजी घेईल, कोकाटेंचे स्पष्टीकरण

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

Walnut Benefits: दररोज ३ ते ४ अक्रोड खाल्ल्याने दूर होते आरोग्याची 'ही' त्रासदायक समस्या

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

SCROLL FOR NEXT