>>सचिन गडदे
Mumbai University Exams Update : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांबाबात मोठी अपडेट आली आहे. विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा अघोषित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे.
पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा सुरुवातीला ३ तारखेपासून घेण्याचे वेळापत्रक मुंबई विद्यापीठाने जाहीर केले होते. परंतु शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या परीक्षांसंदर्भातील कामकाजावर बहिष्कार टाकला. त्यामुळे ३ फेब्रुवारीपासून होणाऱ्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
वेळापत्रकानुसारच होणार परीक्षा
विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने त्यांना न कळवता परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयासाठी विद्यापीठ प्रशासनाची कानउघाडणी केली. त्यानंतर विद्यापीठाने या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे जाहीर केले आहे.
सोमवारपासून म्हणजेच ६ फेब्रुवारीपासून नियोजित वेळापत्रकानुसार पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांचे पेपर घेण्यात येणार आहेत. तसेच ३ फ्रेब्रुवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंत जे पेपर झाले नाही. त्यांचे वेळापत्रक विद्यापिठाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पुढे का ढकलल्या होत्या परीक्षा?
राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. या शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी परीक्षांसंदर्भातील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्राच्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.
परंतु उच्च आणि तत्र शिक्षण विभागाने त्यांना न कळवता या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यापीठाची कानउघडणी केली. त्यानंतर आता या परीक्षा ६ तारखेपासून नियोजित वेळापत्रकानुसारच घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.