Mumbai Underworld Return Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Underworld Return: मुंबईत अंडरवर्ल्ड रिटर्न्स? जेलमधून ऑर्डर, सिद्दिकींचा मर्डर; वाचा स्पेशल रिपोर्ट

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत पुन्हा निर्माण झालीय का? हा प्रश्न भर रस्त्यात माजी मंत्री बाबा सिद्दिकींच्या हत्येने पुन्हा ऐरणीवर आलाय. 25 वर्षांपुर्वी मायानगरी मुंबईवर अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीची दहशत होती. आता बाबा सिद्दिकींच्या हत्येने लॉरेन्स बिश्नोई गँग आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे.

तर बाबा सिद्दिकींनंतर आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या टार्गेटवर सलमान खान असल्याचं समोर आलंय. गंभीर बाब म्हणजे जेलमधूनच बिश्नोई गुन्हेगारी विश्वाची सुत्रे हलवत आहे. त्यामुळे मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली जाण्याची शक्यता आहे.

मुंबईत अंडरवर्ल्ड रिटर्न्स?

  • सलमान खान, सलीम खान, समीर वानखेडेंना धमकी

  • सलमान खानच्या घरावर बिश्नोई गँगकडून गोळीबार

  • अभिषेक घोसाळकर, सचिन कुर्मी या राजकीय नेत्यांच्या हत्यांचं सत्र

  • भररस्त्यात फायरिंग आणि खंडणीचे प्रकार समोर

  • दरवर्षी सरासरी 20 हजार 300 किलोंचे अंमली पदार्थ जप्त

80 आणि 90 च्या दशकात मुंबईत दरोडा, खंडणी, हत्यांचा सुळसुळाट सुरू होता. आधी हाजी मस्तान, अश्वीन नाईक, अरुण गवळी आणि दाऊद गँगने मुंबईतील उद्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्यांना निशाणा बनवत प्रोटेक्शन मनीच्या नावाने खंडणी उकळणं सुरू होतं. मात्र 2000 नंतर मुंबईतील पोलिसांच्या चकमकींमुळे अंडरवर्ल्डवर जरब बसली. मात्र आता याच चमचमत्या मुंबईवर पंजाब, हरियाणातल्या लॉरेन्स बिश्नोई सारख्या टोळ्यांचं लक्ष वळलंय. त्यामुळेच आधी धमकी आणि नंतर हत्येचा सुळसुळाट सुरू झालाय.

बाबा सिद्दिकींच्या हत्येने मुंबईत दाऊद गँगची जागा लॉरेन्स बिश्नोई गँगने घ्यायला सुरुवात केल्याचं स्पष्ट झालंय.. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक ते उद्योगपती आणि राजकारणी यांना टार्गेट करणाऱ्या अंडरवर्ल्डचं नेटवर्क उध्वस्त करण्यासाठी आणि अंडरवर्ल्डच्या दहशतीतून मुंबईला मुक्त करण्यासाठी पोलिसांनी धाडसी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya : मंगळवार तुमच्यासाठी कसा? वाचा आजचे राशीभविष्य

Marathi News Live Updates : काँग्रेसला मोठा धक्का; आमदार हिरामण खोसकर यांचा अजित पवार गटात प्रवेश

Women T20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवाने भारताच्या स्वप्नांवर पाणी; टीम इंडिया T20 वर्ल्ड कपमधून बाहेर

Toll-free entry in Mumbai : मुंबईकरांना टोलमाफीचं गिफ्ट; कोणत्या टोलनाक्यावर हलक्या वाहनांना 'टोल फ्री'? VIDEO

Maharastra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; संजीवराजे,दीपक चव्हाणांच्या हाती तुतारी, आता फलटणमध्ये गणित काय? VIDEO

SCROLL FOR NEXT