Ajit Pawar: स्वपक्षीय साथ देणार की पाठ दाखवणार? विधानसभेला अजित पवार यांची अग्निपरीक्षा; वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : एका बाजूला महायुतीतील संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला पक्षातील नाराजी, या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. सध्या तरी अजित पवार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात एकाकी झुंज देत आहेत.
स्वपक्षीय साथ देणार की पाठ दाखवणार? विधानसभेला अजित पवार यांची अग्निपरीक्षा; वाचा स्पेशल रिपोर्ट
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

पक्षातील बंडानंतर 'घड्याळ तेच वेळ नवी, निर्धार नवपर्वाचा' अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची टॅगलाईन होती. मात्र अजित पवारांची अजून 'वेळ' आली नाही. असंच चित्र आहे. लोकसभेत मोठा फटका बसला. केवळ एक खासदार निवडून आला. त्यानंतर खुद्द मित्र पक्ष भाजप आणि शिंदे गटातील काही नेते अगदी उघडपणे दादांवर टिकेचे बाण सोडतायेत. तर दुसरीकडे पक्षाची जनसन्मान यात्रा आहे.

प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे पक्षासाठी भव्यदिव्य कार्यक्रम घेत आहेत. मात्र, या कार्यक्रमासोबत कार्यकर्त्यांना संघटनात्मक पातळीवर काम करण्यासाठी कृती कार्यक्रम देण्याचीही गरज आहे. मात्र, असा काही कार्यक्रम सध्या ‘राष्ट्रवादी’कडे दिसत नाही. त्यात अनेक ज्येष्ठ नेते तेवढे सक्रीय दिसत नाहीत.

यातच नाशिक मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत, अशी चर्चा आहे. प्रफुल्ल पटेल यांना सहा वर्षांसाठी राज्यसभेची खासदारकी देऊन सुरक्षित केले. मात्र रणनीती ठरवण्यात त्यांचा सहभाग अभावानेच दिसतो. ज्येष्ठ मंत्री-नेते दिलीप वळसे पाटील हे तर अपवादानेच ‘राष्ट्रवादी’च्या कार्यक्रमात दिसतात. मंत्री हसन मुश्रीफ यांची त्यांच्याच मतदारसंघात शरद पवार यांनी कोंडी केली आहे.

तर काहींनी अजितदादांची साथ सोडलीय. कोणी उमेदवारी, महामंडळ, निधीवाटपावरून नाराज आहे. काही आमदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या सर्व नाराजीचा फटका पक्षाला बसू शकतो. त्यामुळे पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार यांना एकट्यालाच झुंज द्यावी लागेल, अशी आजची परिस्थिती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com