Mumbai  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईकरांसाठी खूशखबर! वाहतूक कोंडीतून सुटका होणार; महत्वाच्या महामार्गाबाबत घेतला मोठा निर्णय

Mumbai News : मुंबईकरांसाठी खूशखबर समोर आलीये. यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. महत्वाच्या महामार्गाबाबत महत्वाचा निर्णय घेण्या आलाय.

Vishal Gangurde

सायन‑पनवेल ब्रिज विस्तारासाठी मंजुरी दिली

ट्रॅफिक पोलीस आणि महापालिकेने सुद्धा हा प्रस्ताव मान्य

प्रस्तावानुसार दोन समांतर लेन बांधण्यात येणार

प्रकल्पामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीमध्ये मोठा दिलासा मिळणार

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने सायन-पनवेल महामार्गावर सायन ब्रिजच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मुंबई उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. ट्रॅफिक पोलीस विभागाकडून या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे. तर महापालिकेच्या संबंधित विभागाने एनओसी देखील दिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पूलाच्या विस्तारानंतर दोन समांतर लेन बांधण्यात येईल. या प्रकल्पासाठी पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या निर्णयाने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सायन-पनवेल महामार्ग हा उपनगरातील महत्वाचा मार्ग आहे. या महामार्गावर दिवसाला लाखो वाहनांची रेलचेल असते. सध्या या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. यामुळे सायन ब्रिजचा विस्तार करण्यात यावा, याची मागणी केली जात होती. या ब्रिजचं बांधकाम २००२ साली करण्यात आलं होतं. तेव्हापासून या महामार्गावर लाखो वाहनांची रेलचेल असते.

आता सायन ब्रिजवर तीन लेन आहेत. यातील दोन लेनचा ठाणे आणि ईस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावर जाण्यासाठी उपयोग केला जातो. तर एका लेनचा उपयोग हा दक्षिण मुंबईला जाण्यासाठी केला जातो . मागील वर्षांपासून या महामार्गावर वाहनांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते.

माजी खासदार राहुल शेवाळे यांनी या कामासाठी पाठपुरावा केला होता. त्यांनी डिसेंबर महिन्यात २०२३ साली मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहिलं होतं. त्यावेळी पत्र लिहून सायन ब्रिजच्या विस्तार करण्याची मागणी केली होती. आता या प्रकल्पाला वेग आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actors Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड, मनोरंजन विश्वावर शोककळा

बेडरूममध्ये बॉयफ्रेंड अन् गर्लफ्रेंडचा रोमान्स; बायको आली अन् प्रेयसीला १०व्या मजल्यावर लटकवलं, VIDEO व्हायरल

Shocking: फुगा फुगवताना फुटला, श्वसननलिकेत तुकडा अडकला; १३ वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू

Maharashtra Live News Update: बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांची धरपकड

Suraj Chavan Video : सासुरवाडीत सूरज चव्हाणचा स्वॅग; हटके स्टाइलमध्ये घेतलं बायकोचं नाव, उखाणा होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT