Mahalaxmi multimodal connectivity project features and benefits 
मुंबई/पुणे

मुंबईत होतोय देशाचा पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पादचारी पूल; मोनोरेल, मेट्रो ३ आणि उपनगरीय रेल्वेला जोडणार, प्रकल्पाचे वैशिष्ट्ये काय?

MMRDA Travelator-Equipped Pedestrian Bridge : एमएमआरडीएने (MMRDA) मुंबईतील महालक्ष्मी 'मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी' प्रकल्पाचे जवळपास ९०% काम पूर्ण केले आहे. भारतातील ट्रॅव्हलेटरची (चालता पट्टा) सुविधा असलेला हा पहिलाच पादचारी पूल मेट्रो मार्ग ३, मोनोरेल आणि उपनगरीय रेल्वे सेवांना अखंडपणे जोडेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि प्रवाशांची सोय वाढेल.

Bharat Jadhav

एमएमआरडीएने महालक्ष्मी मल्टिमॉडल कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण केलंय. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाअंतर्गत देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पादचारी पूल तयार केला जातोय. जो संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक, मेट्रो मार्गिका ३ आणि महालक्ष्मी उपनगरीय रेल्वे स्थानक यांना अखंड जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

हा एकात्मिक इंटरचेंज मार्ग झाल्यानंतर स्थानकांदरम्यान बदलण्यासाठी लागणारा वेळ सुमारे २० मिनिटांनी कमी होईल. तसेच दक्षिण मुंबई आणि वरळी परिसरातून मुंबई मोनोरेलपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल. अखंड मल्टिमॉडल जोडणीमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या वापरालाही मोठी चालना मिळेल.

काय आहेत प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:

सुमारे २८३ मीटर लांबीचा एकात्मिक पादचारी पूल.

प्रवाशांच्या सुरळीत हालचालीसाठी ११ मीटर रुंद संरचना.

एकूण १७६ मीटर लांबीचे सहा ट्रॅव्हलेटर्स.

सर्वसमावेशक प्रवेशासाठी दोन प्रवासी लिफ्ट्स.

प्रति तास सुमारे ४,५०० प्रवाशांची क्षमता.

मुंबईतील अत्यंत दाट नागरी सुविधांच्या परिसरात उभारण्यात आलेला हा प्रकल्प एमएमआरडीएच्या अभियांत्रिकी कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या प्रकल्पाच्या पायाभरणीपूर्वी १,८०० मिमी व्यासाची पावसाच्या पाण्याची वाहिनी सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केडीएमसीत भाजप-शिंदेसेना-मनसेमध्ये शीतयुद्ध; नाव न घेता मनसेला इशारा, चर्चांना उधाण

भीमाशंकरमध्ये गर्दी व्यवस्थापनाचा फज्जा! एका बाजूला ट्रॅफिक जाम, दुसरीकडे पोलिस-भाविकांमध्ये हाणामारी

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; गर्दीत धावणार १५ डब्यांच्या लोकल, कर्जत-खोपोली, कसारा, बदलापूरच्या प्रवाशांना दिलासा

1 रुपयात अनलिमिटेड कॉल, रोज १ जीबी डेटा, १०० SMS; पण ही एक अट...BSNL ची जबरदस्त ऑफर

फार्म हाऊसवर सुरू होता भयंकर प्रकार; पोलिसांची धाड पडताच पळापळ, ८ महिलांसह २२ जणांना अटक

SCROLL FOR NEXT