Vande Bharat Sleeper Saam Tv
मुंबई/पुणे

Vande Bharat Sleeper: मुंबई- दिल्ली वंदे भारत स्लीपरचा मुहूर्त ठरला, रूळावरून कधी धावणार? किती तासांत दिल्ली गाठणार?

Vande Bharat Express: मुंबई ते दिल्ली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. ही ट्रेन कधी सुरू होणार याची माहिती समोर आली आहे.

Priya More

मुंबईवरून दिल्ली आणि दिल्लीवरून मुंबईसाठी नेहमी प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई ते दिल्ली प्रवास लवकरच सुसाट होणार आहे. मुंबई ते दिल्ली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. ही ट्रेन कशी असणार आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि मार्ग काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत...

देशभरामध्ये धावत असलेल्या वंदे भारत ट्रेनला प्रवाशांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. वंदे भारत ट्रेनचे तिकीट खूपच महाग आहेत अशामध्ये सर्वसामान्यांना परवडेल अशी वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. वंदे भारत ट्रेन वेग आणि सुविधांच्या बाबतीत खूपच उत्कृष्ट मानली जाते. वाहतुकीसाठी वंदे भारत ट्रेनला प्रवाशांकडून खूप जास्त पसंती मिळते. आता भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर लवकरच लाँच करण्याची तयारी करत आहे. ही ट्रेन प्रवाशांना रात्रीच्या प्रवासासाठी वेगवान आणि अधिक आरामदायी पर्याय देते.

वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबई ते दिल्ली दरम्यान धावेल आणि ताशी १६० किमी वेगाने धावेल. ही ट्रेन राजधानीसारख्या ट्रेनला पर्याय असेल आणि १२ तासांत दिल्ली गाठेल. म्हणजे अवघ्या १२ तासांत तुम्ही मुंबईवरून दिल्लीला पोहचाल. सध्या राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत या ट्रेन कमाल १३० किमी ताशी वेगाने धावतात. राजधानी एक्स्प्रेस मुंबईवरून दिल्लीला १६ तासांत पोहचते. त्यामुळे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांचे ४ तास वाचणार आहेत.

या आर्थिक वर्षात सरकारने ३० वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पुढच्या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच जुलैपर्यंत रुळांवर धावण्यास सुरुवात होईल. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची स्पीड ट्रायल पूर्ण झाली आहे. रेल्वे बोर्ड पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मार्ग आणि भाडे ठरवत आहे.

पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रेल्वेच्या मते, २०२५-२६ या आर्थिक वर्षात एकूण ३० वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवल्या जाऊ शकतात. बेंगळुरू येथील सरकारी मालकीची कंपनी बीईएमएलने म्हणजेच भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडने १० वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार केल्या आहेत. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्यास मान्यता मिळाल्यानंतर उर्वरित ट्रेन देखील हळूहळू रुळांवर आणल्या जातील असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये ८ ते १० वंदे भारत ट्रेन देखील तयार केल्या जात आहेत. या गाड्यांचे कोच BEML आणि ICF द्वारे संयुक्तपणे तयार केले जात आहेत. या वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यानंतर अनेक रेल्वे प्रवाशांना या ट्रेनने प्रवास करून काही तासांमध्ये इच्छित स्थळी पोहचता येणार आहे. यामुळे पैशांची बचत होईल आणि त्याचसोबत वेळेची देखील बचत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT