Thane News Saam tv
मुंबई/पुणे

Thane : ठाण्यात कैद्याचा पोलिसावर हल्ला, सर्वांसमोर कानाखाली मारली

Thane News : ठाणे कारागृहात जन्मठेपेच्या कैद्याने पोलीस कर्मचाऱ्याला कानाखाली मारून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • ठाणे जेलमध्ये कैद्याने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला

  • कानाखाली मारून जीवे मारण्याची धमकी दिली

  • BNS कलमांखाली गुन्हा दाखल

विकास काटे, ठाणे

ठाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जन्मठेपेची शिक्षा असलेल्या एका कैद्याने ठाणे जेलमधील एका पोलीस कर्मचाऱ्याला संतापाच्या भरात कानशिलात मारली. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने पुन्हा एकदा पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभारण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कैदी अविनाश अशोक जाधव याला मुंबई येथील सेशन कोर्टात आणण्यात आले होते. तिथून त्याला पुन्हा कारागृहमध्ये परत आणताना त्याला त्याचा भाऊ काही तरी खायला देत होता. याचदरम्यान उपस्थित पोलीस अंमलदार यांनी कैदीच्या भावाला दूर केलं.

त्याचा राग मनात धरून आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात दिली. इतकंच नाही तर, ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारावर कैद्याने पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देखील दिली.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम BNS १३२, ११५(२), ३५२, ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास ठाणेनगर पोलीस ठाणे करीत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT