नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ ठाकरे बंधूचा मुंबईत तिरंगा मोर्चा
राज ठाकरेंचे मोर्चात राजकीय झेंडे, घोषणा आणि कोणताही गोंधळ टाळण्याचे स्पष्ट निर्देश
विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
विद्यार्थी आणि पालकांच्या पाठिशी महाराष्ट्र ठामपणे उभा
नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज करण्यात आला. याचा निषेध म्हणून ठाकरे बंधूनी मुंबईतील शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत तिरंगा मोर्चा काढणार आहेत. मोर्चाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी राज ठाकरे यांनी सोशलक मीडियावर पोस्ट करत कडक शब्दात इशारा दिला आहे. दरम्यान या मोर्चाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही पाठिंबा आहे.
तिरंगा मोर्चाच्या नियोजनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी शिवतीर्थ या निवासस्थानी पक्षातील शहराध्यक्ष, विभागप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. या बैठकीपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, येत्या २६ जुलैला आपण नीट परीक्षेत उडालेला गोंधळ, त्यासाठी मुलांनी केलेलं आंदोलन सरकारने चिरडण्याचा प्रयत्न केला आणि त्या आंदोलनात मुलांवर झालेला लाठीचार्ज याविरोधात 'तिरंगा मार्च' काढण्यात येणार आहे. हा मार्च कोणत्याही राजकीय हेतूने नसून मुलांच्या भविष्यासाठी आहे. जे दिल्लीत जाऊ शकत नाहीत त्यांनी उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये सामील व्हावं. तसेच मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा किंवा पक्षनेत्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, हा संदेश देणे हा या मार्चचा मुख्य उद्देश आहे. याबाबत त्यांनी म्हटले की , मोर्चाचे निमंत्रक मी आणि उद्धव ठाकरे असलो, तरी त्या नावानेही घोषणा देऊ नयेत, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच या मार्चमध्ये गर्दीचा फायदा घेऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही त्यांनी कठोर इशारा दिला. चुकीच्या घोषणा देणे, गोंधळ घालणे किंवा विशेषतः विद्यार्थिनींना त्रास दिला तर त्यांचा चांगलाच पाहुणचार घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करताना विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनाही मोर्चात सहभागी करून घेण्यास सांगितले. मोर्चात आलेल्या प्रत्येकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची जबाबदारीही कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे त्यांनी नमूद केले. रविवार, १६ जुलै रोजी सकाळी १० वाजता शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी एकत्र जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शांततापूर्ण मार्गाने जनतेच्या मनातील संताप केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार ठाकरे बंधूंनी व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.