सुप्रिम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
डोंबिवली रेल्वे स्थानकातली ही एसी लोकल. गर्दी इतकी की, प्रवासी साध्या लोकलप्रमाणे एसी लोकलच्या दरवाजात लटकतायत..आणि गर्दीमुळे लोकलचे स्वयंचलित दरवाजे बंद होत नाहीयेत आणि गाडीही सुरू होत नाहीये..शेवटी आरपीएफ पोलिसांनी काही प्रवाशांना आत कोंबलं तर काहींना हाताला खेचून बाहेर काढलं. एसी ट्रेनची ही अवस्था असेल तर स्वयंचलित उपनगरी रेल्वे आली तर तिची काय परिस्थिती होईल याची कल्पनाच केलेली बरी. दिवा-मुंब्रा अपघातानंतर रेल्वे मंत्रालयानं दरवाजे बंद होणाऱ्या उपनगरी रेल्वेसंबंधीचा काय पर्याय मांडलाय ते पाहूयात...
कशी असेल बंद दरवाज्याची लोकल?
- दुर्घटना टाळण्यासाठी नॉन एसी गाड्यांमध्येही स्वयंचलित दरवाजे बसवणार
- हवा खेळती राहण्यासाठी स्वयंचलित दारावर पट्ट्या असणार
- डब्यात ताजी हवा येण्यासाठी छतावर व्हेटिलेशन युनिट बसवणार
- प्रवासी एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाऊ शकणार
- नवीन डिझाइनची पहिली ट्रेन नोव्हेंबर 2025 पर्यंत तयार होणार
- जानेवारी 2026 पर्यंत ही ट्रेन सेवेत दाखल होणार
याआधीही 2019 मध्ये पश्चिम रेल्वेनं साध्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मुंबई सेंट्रल कारशेडमधील सिमन्स प्रकारातील लोकलच्या तीन डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले होते. मात्र साध्या लोकलमधील दरवाजे बंद केल्यानं प्रवाशांची आतमध्ये घुसमट झाली होती.
मुंब्र्यातल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाचा लोकल्सचे दरवाजे बंद करण्याचा हा पर्याय किती फोल आहे याचा रियालिटी चेक डोंबिवली स्थानकात पाहायला मिळाला. केवळ डोंबिवलीच नव्हे तर इतर ठिकाणीही थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे. गर्दीमुळे 10 मिनिटे एसी लोकलचे दरवाजे बंद बंद होत नसतील असावेळी सरसकट सगळ्या लोकल्सचे दरवाजे बंद केले तर प्रवाशांचे गुदमरून काय हाल होतील? हा विचारही नको...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.