Mumbai Suburban Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Suburban: उपनगरातील खंडित वीज पुरवठा अवघ्या २० मिनिटात होणार पूर्ववत; कसं ते जाणून घ्या?

Mumbai Suburban News: अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून आधुनिक वितरण व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण तत्काळ शोधून काढून ते दुरुस्त करता येणार आहे.

Sandeep Gawade

Mumbai Suburban

अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून आधुनिक वितरण व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण तत्काळ शोधून काढून ते दुरुस्त करता येणार आहे. याद्वारे खंडित झालेला वीजपुरवठा अवघ्या वीस मिनिटांत पूर्ववत होणार असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.

मुंबई उपनगरात अदाणी इलेक्ट्रिसिटीचे सुमारे ३१ लाख ग्राहक असून त्यामध्ये घरगुती ग्राहकांची संख्या मोठी आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे तांत्रिक बिघाडाचा तत्काळ शोध घेता यावा म्हणून अदाणी इलेक्ट्रिसिटीने आधुनिक वितरण व्यवस्थापन प्रणाली (एडीएमएस) कार्यान्वित केली आहे. त्यानुसार तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास कस्टमर सबस्टेशनच्या माध्यमातून तत्काळ बिघाडाचे ठिकाण समजणार आहे. उपनगरात अशा प्रकारचे ७१०० कस्टमर सबस्टेशन आहेत. त्यामुळे बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करणे शक्य होणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वीज वितरण यंत्रणेत बिघाड झाल्यास त्याची ट्रान्सफॉर्मरपर्यंतची माहिती नियंत्रण कक्षाला स्काडा यंत्रणेमार्फत मिळते; तर कस्टमर सबस्टेशन दरम्यानच्या बिघाडाची माहिती एडीएमएस यंत्रणा सेन्सरच्या माध्यमातून संकलन करून त्याचे विश्लेषण करते. तसेच यंत्रणेवर कोणत्या ठिकाणी बिघाड झाला आहे, कोणत्या ठिकाणी ताण येऊन बिघाड होऊ शकतो, त्यावर काय उपाययोजना कराव्यात, याचे पर्याय स्काडा यंत्रणेला देते. त्यामुळे संभाव्य तांत्रिक बिघाड कमी करणे शक्य होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election : प्रचारावेळी पैसे वाटपावरून दोन्ही राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस भिडले; सांगलीत जोरदार राडा

Box Office Collection: प्रभासचा 'द राजा साब' आणि रणवीर सिंग'धुरंधर' आमने-सामने; कोणी केली सर्वात जास्त कमाई

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला गोड पदार्थ करताय? मग गुलगुल्यांची पारंपारिक रेसिपी वाचाच

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विरोधकांवर टीका करू नका, भाजपच्या वरिष्ठांकडून उमेदवारांना कानमंत्र

Maharashtra Live News Update : पुण्यात मतदान पेट्या ने-आण करण्यासाठी PMPML च्या १०५६ बसेस धावणार

SCROLL FOR NEXT