MUMBAI SRA SCAM: ₹275 CRORE FRAUD ALLEGED IN MALAD REDEVELOPMENT PROJECT Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत मोठा घोटाळा! SRA प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार; ED आणि SEBI कडे तक्रार दाखल

Mumbai Malad News : मुंबईतील मालाड पूर्व खोट डोंगरी SRA प्रकल्पात 275 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप. गुंतवणूकदारांची फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग आणि निधीचा गैरवापर प्रकरणी ED व SEBI कडे तक्रार दाखल.

Alisha Khedekar

  • मालाड SRA प्रकल्पात 275 कोटींचा घोटाळा उघड

  • गुंतवणूकदारांकडून निधी उभारून प्रकल्प ठप्प

  • ED आणि SEBI कडे तक्रार दाखल

  • रहिवाशांना घरे व भाडे भरपाई अद्याप नाही

  • मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप

संजय गडदे, मुंबई

मुंबईतील मालाड पूर्व येथील खोट डोंगरी SRA पुनर्विकास प्रकल्पात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप समोर आले आहेत. या प्रकरणात शाह हाउसकॉन प्रायव्हेट लिमिटेड, सार्वजनिक सूचीबद्ध बी राइट ग्रुप आणि संबंधित व्यक्तींविरोधात ED आणि SEBI कडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, या प्रकल्पाच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उभारण्यात आले, मात्र प्रकल्पाची कामे पुढे सरकली नाहीत. सुमारे २७५ कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक फसवणूक, निधीचा गैरवापर, मनी लॉन्ड्रिंग आणि गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

डेव्हलपर कंपनीने आधीच गहाण ठेवलेल्या मालमत्तेवर आणि जुने वाद सुरू असतानाही विविध लोकांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे एकाच प्रकल्पावर अनेक आर्थिक दावे निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र रहिवाशांना अनेक वर्षांपासून घरे मिळालेली नाहीत. तसेच काहींना भाडे भरपाईही देण्यात आलेली नाही.

फेब्रुवारी २०२६ मध्ये याच प्रकल्पासंदर्भात ५.१५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा मन्सुख शाह आणि आकाश शाह यांच्याविरोधात कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. नंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तक्रारदारांनी SEBI कडे संपूर्ण व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट, बँक खात्यांची चौकशी आणि निधीचा मागोवा घेण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे मुंबईतील रिअल इस्टेट आणि SRA प्रकल्पांच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, २२ वर्षीय इंजिनिअरचा घाबरून मृत्यू; पुण्यात खळबळ

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसची रॅली

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! शिपायापासून सचिवांपर्यंत किती असेल पगार?

Bathroom mirror cleaning: आरशावरचे हट्टी डाग कसे काढाल? या 5 टीप्सने होईल आरसा होईल चकचकीत

Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी

SCROLL FOR NEXT