मुंबईकरांनो काळजी घ्या! कोरोनासोबत 'या' ही आजारांचे वाढले संकट  Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांनो काळजी घ्या! कोरोनासोबत 'या' ही आजारांचे वाढले संकट

करोनाच्या साथीसोबत लढत ही साथ आटोक्यात आणण्यात यश मिळत आहे. परंतु कोरोनासोबत आता मुंबईवर पावसाळ्यातील साथींच्या आजाराचे संकट घोंघावत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: करोनाच्या Corona साथीसोबत लढत ही साथ आटोक्यात आणण्यात यश मिळत आहे. परंतु कोरोनासोबत आता मुंबईवर Mumbai पावसाळ्यातील साथींच्या आजाराचे संकट घोंघावत आहे. मुंबईत आता मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू, लेप्टोस्पायरोसीस अशा आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. या आजारांच्या रुग्णांमध्ये महिन्याभराच्या काळात तर दुपटीचे वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हे देखील पहा-

परंतु एक दिलासादायक बाब म्हणजे, या साथीच्या आजारांनी कोणाचाही बळी घेतलेला नाही. गेल्या वर्षी सन 2020 मध्ये एकट्या मलेरिया या आजाराचे 5 हजार 7 एवढे रुग्ण आढळले होते. तर लेप्टोस्पायरोसीसचे एकूण 240 रुग्ण होते आणि यांपैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी तब्बल 2 हजार 549 जणांना गॅस्ट्रोने त्रस्त केले होते, तर H1N1 चे 44 रुग्ण होते.

यंदाची साथीच्या आजारांची स्थिती:

अजून मुंबईवरील करोनाचे संकट पूर्णपणे दूर झालेले नाही. त्यात आता पावसाळ्यातील आजारांचे रुग्णही वाढत असल्याचे दिसून येत आहे. यंदा जुलै महिन्यापर्यंतची स्थिती पाहिल्यास गॅस्ट्रोचे 1 हजार 572 आहेत. लेप्टोस्पायरोसीसचे 96, डेंग्यूचे 77 आणि H1N1 चे 28 रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत लेप्टोचा एक रुग्ण मरण पावला आहे.

Edited BY-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

Shivsena Dispute : ...तर ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचं भाकित, EXCLUSIVE

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘नाशिकची स्पेशल मिसळ थाळी’; चव अशी की पोट भरून खातील! 

Marathi LanguageRule: मुजोरी कराल तर आयुष्यभरासाठी लायसन्स रद्द करू, प्रताप सरनाईकांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना इशारा

SCROLL FOR NEXT