संजय डाफ
नागपूर : सुट्टी घालवण्यासाठी पाहुणे म्हणून आलेल्या पतीच्या नातेवाईकांविरुद्ध कौटुंबिक छळाची Harassment कारवाई करता येऊ शकत नाही, असे महत्त्वपूर्ण मत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं Nagpur Bench एका प्रकरणात नोंदविल आहे. पतीकडून होत असलेला छळ हा त्याच्या घरी येत असलेल्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून होत असल्याचा आरोप पत्नीने केली होती. या प्रकरणी नागपूर खंडपीठाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
हे देखील पहा-
या प्रकरणी पत्नीनं पती, सासू, दीर, नणंद, त्यांची मुले अशा एकूण आठ जणांविरुद्ध कौटुंबिक अत्याचार कायद्याच्या कलम २९ अंतर्गत पोलिसांत तक्रार दिली होती. याप्रकरणी १५ सप्टेंबर २०१९ ला गुन्हाही Crime दाखल झाला होता. याचिकाकर्त्यांनी कारवाईला आव्हान दिले असता, न्यायालयाने पोलिसांना तपास करण्याची अनुमती दिली होती. मात्र, न्यायालयाच्या परवानगीशिवाय दोषारोपपत्र दाखल करण्यात येऊ नये, असेही बजावले होते.
उच्च न्यायालयानं सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर निर्णय दिला. कौटुंबिक अत्याचार किंवा छळासाठी दोन व्याख्या विचारात घेणे गरजेचे आहे. कौटुंबिक नाते आणि एकाच घरातील वास्तव्य महत्त्वाचे आहे. यातील पती आणि तक्रारदार हे एकत्र तर इतर स्वतंत्र व वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. तक्रारदार महिलेनं पती वगळून इतर नातेवाईक एकाच इमारतीमध्ये वेगवेगळ्या माळ्यावर राहात असल्याचाही दावा केलेला नाही. नातेवाईक म्हणून सुटीच्या काळात ते काही दिवसांसाठी त्यांच्याकडे यायचे ते आल्यानंतर माझ्या पतीला माझ्याविरुद्ध भडकावत होते आणि त्यामुळे पती माझा मानसिक आणि शारीरिक छळ करीत होता, असा दावा तक्रारदार महिलेने केला आहे. पतीचे नातेवाईक कधी त्यांच्यासोबत राहात होते, असेही नाही. त्यामुळे त्यांच्याकडून शारीरिक, मानसिक छळ होण्याची शक्यता कमी आहे, असं कोर्टानं आपल्या निर्णयात नमूद केलं.
हा निर्णय एक मैलाचा दगड ठरणार आहे. कारण अनेकदा पत्नीकडून पती आणि तिच्या नातेवाईकांवर आरोप आणि तक्रार केली जाते. अनेक प्रकरणात नातेवाईकांचा संबंध नसतो. मात्र, तरी देखील त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवलं जातं आणि बरेचदा शिक्षाही होते. मात्र, या निर्णयामुळे यावर खोट्या तक्रारींवर वचक बसेल.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.