Central Railway Mega Block saam tv
मुंबई/पुणे

New Year Special Local Trains: मध्य रेल्वेकडून प्रवाशांना नववर्षाची भेट; ३१ डिसेंबरला मध्यरात्री चालवणार विशेष लोकल ट्रेन,पाहा वेळापत्रक

New Year Special Local Trains In Mumbai Midnight: मध्य रेल्वेने मुंबईकरांना नववर्षाची विशेष भेट दिली आहे. मध्य रेल्वे नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईकरांसाठी ४ विशेष उपनगरीय सेवा चालविणार आहे.

Vishal Gangurde

आवेश तांदळे, मुंबई

New Year Special Local Trains In Mumbai:

मध्य रेल्वेने मुंबईकरांना नववर्षाची विशेष भेट दिली आहे. मध्य रेल्वे नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईकरांसाठी ४ विशेष उपनगरीय सेवा चालविणार आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरला मध्यरात्री नववर्षाचं स्वागत करून उशीरा रात्री परतताना येणार आहे. (Latest Marathi News)

मध्य रेल्वे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ४ विशेष उपनगरीय सेवा चालविणार

मध्य रेल्वे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (३१.१२.२०२३ / १.१.२०२४ च्या मध्यरात्री) प्रवाशांकरिता विशेष उपनगरीय सेवा चालविणार आहे. मध्य रेल्वे, हार्बर लाइन या दोन्ही मार्गावर विशेष लोकल मुंबईकरांना उपलब्ध असणार आहे.

मध्य रेल्वेचं वेळापत्रक कसं असेल?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२३ /१.१.२०२४ च्या मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.०० वाजता पोहोचेल.

कल्याण येथून विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२३ / १.१.२०२४ च्या मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०० वाजता पोहोचेल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हार्बर मार्गावर वेळापत्रक कसं असेल?

विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२३ / १.१.२०२४ च्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.३० वाजता सुटेल आणि ०२.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल.

पनवेल येथून विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२२/१.१.२०२३ च्या मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.५० वाजता पोहोचेल. या सर्व विशेष उपनगरी ट्रेन सर्व स्थानकांवर थांबतील. तसेच रेल्वेने प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT