Mumbai Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai shooting : मुंबई हादरली! सायन कोळीवाडा परिसरात गोळीबार, एक जण जखमी

Mumbai shooting latest update : मुंबईतून पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. मुंबईच्या सायन कोळीवाडा परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पॅरोलवर सुटून आलेल्या इसमाने गोळीबार केला आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड, मुंबई

Mumbai Crime News :

मुंबईतून पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. मुंबईच्या सायन कोळीवाडा परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पॅरोलवर सुटून आलेल्या इसमाने गोळीबार केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सायन कोळीवाडा चर्च परिसरात गोळीबार झाल्याची माहिती हाती आली आहे. पॅरोलवर सुटून आलेल्या व्यक्तीने गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. पैशांच्या मागणीसाठी गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबार प्रकरणी अँटॉप हिल पोलीस आणि गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईच्या सायन कोळीवाडा चर्च परिसरात पैशांच्या व्यवहारातून आरोपी आणि पीडित व्यक्तीमध्ये भांडण झालं. या दोघांमधील भांडण टोकाला पोहोचलं. त्यानंतर आरोपीने पीडित व्यक्तीवर गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेत पीडित व्यक्ती जखमी झाला. या घटनेतील पीडित व्यक्तीला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी पहाटे झालेल्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

तत्पूर्वी, या गोळीबार प्रकरणी अँटॉप हिल प्रकरणी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०७ आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. या आरोपीला बेड्या ठोकण्यासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र पथक तयार केल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गेल्या 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सातपुड्यात पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

MPSC Exam Update: राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या; नवी तारीख काय?

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT