Mumbai Crime  Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आता राजकीय दबावाचा नवा वाद, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime News : मुंबईत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आता राजकीय दबावाचा नवा वाद निर्माण झाला आहे.

Vishal Gangurde

मुंबईच्या ओशिवरा परिसरात १० वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना

पोलिसांनी तात्काळ कारवाई करून केली आरोपीला अटक, पोस्को कायद्यानुसार गुन्हाही दाखल

त्यानंतर राजकीय कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा व्हिडिओ समोर

या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या जोगेश्वरी–ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा गंभीर घडला. या प्रकारानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तत्काळ तक्रार दाखल केली. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली. आता त्याच्याविरुद्ध POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या जलद आणि कठोर कारवाईचे सर्वच स्तरांत कौतुक होत आहे.

मात्र, प्रकरणानंतर सोशल मीडियावर काही पोलिस अधिकाऱ्यांबद्दल दिशाभूल करणारी माहिती आणि चुकीचे आरोप पसरवले जात आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेची प्रतिमा जाणीवपूर्वक डागाळली जात असल्याचा आरोप वरिष्ठांकडून करण्यात आला आहे.

यात आणखी गंभीर म्हणजे, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या माध्यमातून थेट ओशिवरा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांवर दबाव आणत असल्याचा दावा स्थानिक सूत्रांकडून केला जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून उत्तमरीत्या कारवाई केली आहे. मात्र, अशा प्रकारे राजकीय दबाव टाकण्याच्या प्रयत्नांमुळे प्रकरणामुळे नवा वाद उफाळला आहे.

कायदेतज्ज्ञांचे मत आहे की, 'गुन्ह्यात पोलिसांनी तत्काळ आणि प्रभावी कारवाई केली असताना, त्यांच्यावर राजकीय किंवा संघटनात्मक दबाव आणणे ही चुकीची आणि असंवैधानिक पद्धत आहे. या पार्श्वभूमीवर ९ नोव्हेंबर २०२५ रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यासमोर आंदोलनाची शक्यता आहे. या कारणात्सव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Politics: काँग्रेस बुडाली, नेते मात्र हवेत; चंद्रपूर महापालिकेत गटनोंदणीत नवा ट्विस्ट

ZP Election: माझा नाद नाही करायचा, थांब तुझी एन्क्वायरीच लावतो..., शिंदेंच्या आमदाराकडून भरसभेत बंडखोर उमेदवाराला धमकी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

अजितदादांच्या मृत्यूबद्दल वाढलं संशयाचं धुकं; छगन भुजबळ,पटेलांनीही सोडलं अपघातावर मौन

Phone slow tips: मोबाईल स्लो झाला असेल तर या सोप्या टीप्स वापरा

SCROLL FOR NEXT