Yuvasena Shrikant Shinde Saam TV
मुंबई/पुणे

युवकांची मागणी, युवासेनेच्या अध्यक्षपदी श्रीकांतदादांची वर्णी; शिंदे समर्थकांकडून फोटो Viral

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची युवासेनेच्या अध्यक्षपदी वर्णी लागणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली: राज्यातील सत्तासंघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बाजी मारली अन् मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. केवळ राज्याच्या कारभाराची सुत्र आपल्या हाती आली म्हणून शिंदे गप्प बसले नाहीत. तर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवरच आपला दावा करायला सुरुवात केली होती ती प्रत्यक्षात आमलात देखील आणली.

शिंदे यांनी आपलीचं शिवसेना (Shivsena) खरी असल्याचा दावा करत त्यासाठी पक्षांचे उपनेते, प्रवक्ते यांच्या नियुक्ता केल्या. शिवाय आता तर शिंदे गटाकडून प्रतिशिवसेना भवन देखील उभारण्यात येणार आहे.

त्यामुळे शिंदे विरुद्ध ठाकरे असा शिवसेनेसाठी संघर्ष सुरु असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची युवासेनेच्या अध्यक्षपदी वर्णी लागणार अशी चर्चा रंगू लागली आहे. कारण याबाबतचे फोटो सोशल माध्यमातून खा.शिंदे यांचे कार्यकर्ते व्हायरल करू लागले आहेत.

पाहा व्हिडीओ -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता राज्यभर दौरे करत आहेत, तर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे राज्यभरात दौरे करत आहेत.त्यामुळे खासदार शिंदे यांच्या खांद्यावर शिंदे गटाने युवा सेना अध्यक्ष पदाची धुरा द्यावी असे शिंदे समर्थकांचे खासगीत म्हणणे आहे.

त्यामुळे कार्यकर्ते फोटो आणि पोस्टर व्हायरल (Viral Photo) करत आहेत. त्यामुळे शिवसेना प्रवक्ते, नेते यांच्या नियुक्त्या केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे आपले पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर युवा सेना अध्यक्ष पदाची धुरा देणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

Yuvasena Shrikant Shinde

दरम्यान, बुलढाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी देखील मागे श्रीकांत यांनी युवासेनेचे अध्यक्ष बनवावं अशी मागणी केली होती. 'आपल्याला युवा सेनेचं काम वाढवायचं आहे. त्यासाठी श्रींकात शिंदे यांना लवकरात लवकर युवा सेनेची जबाबदारी द्यावी, एवढी माझी मागणी आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेचा युवासेना अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: शरद पवार गटाला मोठा धक्का! गडचिरोलीत बाबा आत्रम यांचा विजय

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

SCROLL FOR NEXT