Sanjay Raut
Sanjay Raut SAAM TV
मुंबई/पुणे

Court Fines Sanjay Raut: संजय राऊत यांना मोठा दणका; शिवडी न्यायालयाने ठोठावला दंड, काय आहे प्रकरण?

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना शिवडी न्यायालयाने दणका दिला आहे. संजय राऊत आज कोर्टात हजर झाले नसल्याने न्यायालयाकडून एक हजार रुपये दंड लगावण्यात आला आहे. संजय राऊत यांच्या विरोधात डॉ. मेधा सोमय्या यांनी अब्रूनुकसानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हजर न राहिल्याने हा दंड लगावण्यात आला आहे. (Latest Marathi News)

ठाकरे गटाचे मुखपत्र सामना वृत्तपत्रात १०० कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्या असल्याचं म्हटलं होतं. यानंतर संजय राऊत यांच्या विरोधात डॉ. मेधा सोमय्या यांनी अब्रूनुकसानीची याचिका दाखल केली होती.

त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वकिलांकडून आज न्यायालयीन कामकाजात गैरहजर राहण्याचा अर्ज केला. मात्र न्यायालयाने तो मान्य न करता हजार रुपयांचा दंड ठोठावला. या याचिकेवर पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे.

या प्रकरणात संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. संजय राऊत यांनी कुठलाही पुरावा नसताना मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. त्यावेळी किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. याच प्रकरणात राऊतांच्या अडचणी वाढताना दिसत आहे.

१०० कोटींचा शौचालया घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे?

किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांनी कुटुंबाच्या संस्थेच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा शौचालय घोटाळा झाला आहे असं राऊत म्हणाले होते. तसेत ही मंडळी कुठे कुठे पैसे खातात पाहा. विक्रांतपासून ते शौचालयापर्यंत असा टोला राऊत यांनी लगावला.

किरीट सोमय्या आणि त्यांचे कुटुंब युवा प्रतिष्ठान नावाची संस्था चालवत होते. त्यांनी केलेल्या या शौचालय घोटाळ्याची कागदपत्रे पाहून हसायला आले. खोटी बिले, पर्यावरणाचा ऱ्हास करुन निर्माण केलेले शौचालय, पैसे कसे काढले याची माहिती बाहेर येईल, असं राऊत म्हणाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithila Palkar : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

Nashik Lok Sabha: शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम, नाशिकमध्ये महायुतीला घाम! गोडसेंच्या अडचणी वाढणार?

Special Report : कुलरची थंड थंड हवा ठरतेय जिवघेणी! 7 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत

Maharahstra Politics: ठाण्यात महायुतीचा मार्ग सुकर, गणेश नाईकांची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीसांना यश

Special Report : जिकडे तिकडे नोटाच नोटा! मंत्र्याच्या सचिवाकडे कोटींचं घबाड

SCROLL FOR NEXT