Anil Deshmukh Saam TV
मुंबई/पुणे

Anil Deshmukh: अनिल देशमुखांचा मुक्काम तुरुंगातच; न्यायालयाने फेटाळला जामीन

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

सुरज सावंत

मुंबई : अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता त्या अर्जावरती आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होती मात्र त्यांचा जामीन न्यायलायाने फेटाळला आहे. (Anil Deshmukh Bail Hearing Updates)

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या ५००० पानी पुरवणी आरोपपत्रानंतर अनिल देशमुखांतर्फे विशेष पिएमएलए कोर्टात (PMLA Court) जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या जामिन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावनी झाली असता. न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन फेटाळून लावला अनिल देशमुख सध्या आर्थररोड तुरूंगात आहेत

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांना पाच वेळा समन्स बजावले होते. परंतु, अनिल देशमुख ED समोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या नावाने लूक आऊट नोटीस जारी करण्यात आलं होतं. दरम्यान ते १ नोव्हेंबर २०२१ रोजी ईडीच्या कार्यालयात ते हजर झाले. त्यावेळी त्यांची १२ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्यांना ईडीने अटक केली होती.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT