Nana Patole : 'त्या' मोदीला पोलिसांनी अटक केल्याची पटोलेंनी दिली माहिती

काँग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलें त्यांच्या वक्तव्यामुळे कालपासून चांगलेच अडचणीत आले आहेत, त्यांच्या त्या वक्तव्यावरती भाजप आक्रमक झाली असून नाना पटोलेंना अटक करण्याची मागणी देखील भाजपकडून केली जात आहे.
'त्या' मोदीला पोलिसांनी अटक केल्याची नाना पटोलेंनी दिली माहिती
'त्या' मोदीला पोलिसांनी अटक केल्याची नाना पटोलेंनी दिली माहितीSaam TV

नागपूर : काँग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलें (Nana Patole) त्यांच्या वक्तव्यामुळे कालपासून चांगलेच अडचणीत आले आहेत, त्यांच्या त्या वक्तव्यावरती भाजप आक्रमक झाली असून नाना पटोलेंना अटक करण्याची मागणी देखील भाजपकडून (BJP) केली जात आहे. त्यासाठी भाजपकडून याबाबत राज्यभरात तीव्र आंदोलन केली जात असतानाच अखेर या प्रकरणाबाबतीत नाना पटोलेंनी मोठा खुलासा केला आहे.

'भंडारा पोलिसांनी (Bhandara) मोदी नावाच्या गुंडाला पकडले असून याबाबतीत लोकांचे जबाब घेणं सुरु आहे. दरम्यान यावेळी त्यांनी भाजपवरती निशाना देखील साधला आहे. भाजप मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी, विषयाचा, वाक्याच्य़ा अर्थाचा अनर्थ करत आहे पंतप्रधानपद हे एका पक्षाचा नसते तरते देशाचा असतं हे आम्हाला चांगल माहित असल्याचेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

'त्या' मोदीला पोलिसांनी अटक केल्याची नाना पटोलेंनी दिली माहिती
Akola: नाना पटोले यांच्या विरोधात अकोल्यात भाजपतर्फे तक्रार

तसंच भाजप कोरोनाचे नियम (Corona Rules) तोडून आंदोलन करत आहे. लोकांच लक्ष भरकटविण्यासाठी भाजपचे लोकं आंदोलन करत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला आहे. दरम्यान आपण भंडारा पोलिसांना सांगितले आहे की या प्रकरणाचा तपास करा, जर तसा गावगुंड नसेल तर माझ्यावर कारवाई करा हा गावगुंड कोण याचा भंडारा पोलीस तपास करत आहेत, मी भाषणात बोलत नव्हतो तर मी लोकांना हिंमत देण्यासाठी बोलत होतो. शिवाय काँग्रेस प्रधानमंत्री पदाचा आदर करते असही ते यावेळी म्हणाले.

हे देखील पहा -

प्रधानमंत्रीपदाचा मान घालवणाऱ्या भाजपच्या या आंदोलनाचा आपण निषेध करतोय आणि या आंदोलनाविरोधात काँग्रेसकडून (Congress) पोलिसात तक्रार करण्यात येणार असल्याच पटोलेंनी सांगितलं ललीत मोदी, नीरव मोदी असे अनेक मोदी नावाचे लोक असतात आणि ते या देशातून पळून गेले त्यामुळे त्याचं काय झालं मात्र आपण त्याविषयावरती जात नाही, मात्र नको त्या मुद्दायला महत्व देत भाजप महाराष्ट्राची बदनामी करत आहे असंही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com