Nawab Malik
Nawab Malik Saam TV
मुंबई/पुणे

Nawab Malik : नवाब मलिक यांना दिलासा नाहीच; जामीन अर्ज कोर्टाने नाकारला, अडचणी आणखी वाढणार?

सूरज सावंत

Nawab Malik News : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. माजी मंत्री मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना आता कोठडीतच राहावे लागणार आहे. मलिक यांचा जामीन अर्ज कोर्टाने नाकारल्याने त्यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मलिक सध्या कुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत (Latest Marathi News)

माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. माजी मंत्री नवाब यांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती रोकडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, मलिक यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांचा पुढचा मुक्काम कोठडीतच असणार आहे. मात्र, मलिक सध्या कुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

काय आहे प्रकरण ?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, नवाब मलिक हे सरकारमधील मंत्री होते. त्यावेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असल्याच्या आरोपावरून ईडीने (ED) त्यांना 23 फेब्रुवारीला अटक केली होती.

याशिवाय कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडमधील जमीन खरेदी ही हसीना पारकर यांच्याकडून कवडीमोल भावात विकत घेतल्याचा ईडीचा आरोप आहे. या व्यवहारात नवाब मलिक यांनी आर्थिक गैरव्यवहार केला, असा आरोपही ईडीकडून करण्यात आला. मलिक यांच्याकडून हसीना पारकर यांनी स्वीकारलेले पैसे टेरर फंडिंगसाठी दाऊदने वापरल्याचा आरोप ईडीने केला आहे.

यापूर्वी नवाब मलिक यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मलिक यांचा जामीन अर्ज कोर्टाने पुन्हा एकदा फेटाळला आहे. सुमारे पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिक यांच्या वकिलांकडून करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप याप्रकरणात दिलासा मिळाला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut News: संजय राऊत यांच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

Breaking: मोठी बातमी! आता पुणे सोलापूर मार्गावर होर्डिंग कोसळून अनेक गाड्यांचं प्रचंड मोठं नुकसान

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग कोसळलं; अनेक वाहनांसह घोडा अडकला

Maharashtra Rain News : राज्यात आजही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; केळीच्या बागा भूईसपाट, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

Today's Marathi News Live: पुणे सोलापूर रोडवर होर्डिंग कोसळलं; वाहनांचं मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT