Palghar Accident News  Saam TV
मुंबई/पुणे

मुंबईतून धक्कादायक बातमी! भीषण अपघातात ज्येष्ठ शिवसैनिकाने गमावला जीव; परिसरात हळहळ

Palghar Latest News : पालघरमधील शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ज्येष्ठ शिवसैनिक आणि वीटभट्टी व्यावसायिक रवींद्र पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

Palghar Accident News : पालघरमधील शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर झालेल्या भयंकर अपघातात ज्येष्ठ शिवसैनिक रवींद्र गोपाळ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. शिरसाड नाक्याजवळ हायवा ट्रकखाली चिरडून ५७ वर्षीय रवींद्र पाटील यांचा मृत्यू झाला. रवींद्र पाटील हे पालघरमधील वीटभट्टी व्यावसायिक आणि शिवसैनिक होते. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अपघात झाल्याची नोंद पोलिसांनी केली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण वसई आणि पारोळ परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे.

अपघाताची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी पाटील यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणात पुढील तपास करण्यात येत आहे.

५७ वर्षांचे रवींद्र पाटील हे पालघरमधील पारोळ येथील रहिवासी असून वीटभट्टी व्यावसायिक होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र पाटील चांदीप येथील बँकेतून दुचाकीने शिरसाडच्या दिशेने जात होते. शिरसाड नाक्याजवळ पोहोचल्यानंतर मागून येणाऱ्या एका हायवा ट्रकने अचानक डाव्या बाजूला गाडी वळवली. ट्रक चालकाच्या या निष्काळजीपणामुळे पाटील यांची दुचाकी थेट ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हायवा ट्रक आणि दुचाकीचा अपघात इतका भयंकर होता की रवींद्र पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पालघरमधील वाहतूक व्यवस्थेबाबत स्थानिक ग्रामस्थ आणि शिवसैनिकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. रात्रंदिवस या मार्गावरून क्षमतेपेक्षा जास्त रेती आणि खडी वाहून नेणाऱ्या हायवा गाड्यांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आणि पोलिसांनी कोणतीही कडक कारवाई केली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भ्रष्टाचार आणि चोरी झालीच पाहिजे; भरसभागृहात महायुतीच्या नेत्याचे खळबळजनक विधान

Monsoon Special Food : पावसाळ्यात घरी झटपट अशी बनवा वांग्याची भजी

Trendy One Piece Dress: पावसाळ्यात ट्राय करा हे 7 ट्रेंडी वन पीस डिझाईन्स; स्टाईलसोबत मिळेल कम्फर्टही

पावसाळ्यात पारंपारिक पद्धतीची अळुच्या देठांची भाजी कशी बनवायची? सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे, पण परसेंटेज कमी असायला पाहिजे - सदाशिव पाटील

SCROLL FOR NEXT