Mumbai Coastal Road Saam Tv
मुंबई/पुणे

Versova-Dahisar Coastal Road: नदी-खाडीच्या खालून जाणार भूयारी मार्ग, खर्च किती अन् वेळ किती वाचणार?

Versova-Dahisar Coastal Road News: मुंबईतील वाहतूक कोंडी आणि वर्सोवा ते दहिसरमधील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी पालिकेने वर्सोवा व दहिसरला जोडणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्प हाती घेतला आहे

Namdeo Kumbhar

Versova-Dahisar Coastal Road High-Speed Corridor: मरीन ड्राइव्ह ते वरळी दरम्यान कोस्टल रोड 2024 वर्षाच्या सुरुवातीलाच खुला झाला. त्याशिवाय ठाणे ते बोरीवली यादरम्यानचा बोगदा सुरु झालाय. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीतून थोडी सुटका मिळाली. आता पालिकेने दुसऱ्या टप्प्यातील कोस्टल रोडचं काम सुरु केले आहे. वर्स्वोवा ते दहिसर यादरम्यान कोस्टल रोडचा दुसरा टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्याचा खर्च तब्बल १६ हजार ६२१ कोटी रुपये इतका आहे. २३ किमी रस्ता तयार करण्यासाठी इतका खर्च का असा प्रश्न सर्वांना पडला असेल. पण कोस्टल रोडवर (सागरी मार्ग) पूल, बोगदा, उन्नत मार्ग अशी रचना आहे. कोस्टल रोड पूर्णपणे तयार झाल्यानंतर मुंबईकरांना वाहतूककोंडीमधून कायमचा आराम मिळणार आहे. जिकडे तीन - चार तास लागतात, तो प्रवास फक्त ४० मिनिटांत पूर्ण होणार आहे. पण हा मार्ग कसा आहे, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...

वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड प्रकल्प सहा टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबईचे दक्षिण टोक व पश्चिम उपनगरे, मुलुंड व ठाण्याशी जोडली जातील, अन् वाहतूक कोंडी सुटेल, यासाठी मनपाने हा प्रोजेक्ट्स हाती घेतला. कोस्टल रोड प्रोजेक्ट्समुळे मुंबईची वाहतूक अधिक वेगाने होईल.

बोरिवलीवरून ठाण्याला केवळ २० मिनिटांत पोहोचता यावे यासाठी एमएमआरडीएने ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा (भूमिगत मार्ग) सुरु केला. यासाठी कोट्यवधींचा खर्च झाला. पण आता कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान यापेक्षा मोठा बोगदा तयार करावा लागणार आहे. जमिनीच्या खाली ४० मीटरवर हा बोगदा तयार करण्यात येणार आहे. या ट्वीन टनेलमुळे मालाडमधील माइंडस्पेस आणि कांदिवलीच्या चारकोप गावादरम्यानचा प्रवास सोपा होणार आहे.

वर्स्वोवा आणि दहीसर शहरांना जोडण्यासाठी बीएमसीनं हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट सुरु केला आहे. MCRP मार्फत 22.93 किमीचा हाय-स्पीड कॉरिडोर तयार करण्यात येणार आहे. या कॉरिडोरमुळे मुंबईच्या उत्तर-पश्चिम उपनगरे जोडली जातील. यामधील चार किमीचा रस्ता हा दुहेरी बोगदा असलेला असेल. उत्तर मुंबईतील दाट लोकवस्तीच्या भागांतून पोईसर नदी, मध खाडी आणि खारफुटीच्या पॅचेसच्या खालून हा बोगदा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे याचा खर्चही मोठ्या प्रमाणात असेल. हा चार किमीचा बोगदा जमिनीच्या ४० मीटर खालून असेल. कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचा एकूण खर्च १६,६२१ कोटी रुपये इतका आहे, यातील ५८२१ कोटी रुपये हे चार किमीच्या बोगद्यासाठी देण्यात आले आहेत.

नदी अन् खाडीच्या खालून जाणार बोगदा - (Tunnels beneath river and creek)

वर्स्वोवा अन दहीसर यादरम्यान २३ किमीचा कोस्टल रोड तयार होणार आहे. पण त्यापैकी जवळपास चार किमीचा रस्ता सर्वात महत्वाचा आहे. कारण, हा बोगदा नदी आणि खाडीच्या खालून जात आहे. त्याशिवाय त्या भागात दाट लोकवस्तीही आहे. गिरगाव चौपाटी आणि मलबार हिल यादरम्यान तयार करण्यात आलेल्या बोगद्यापैकी याची लांबी जवळपास दुप्पटच आहे. नदी आणि खाडीच्या खालून जाणारा मुंबईतील हा पहिलाच बोगदा असेल.

बोगद्यांचे उत्तर टोक चारकोप तर दक्षिणेकडील टोक माइंडस्पेस (मालाड) पासून सुरु होते. दोन बोगदे एकमेकांना समांतर असतील. MCRP च्या दुसऱ्या टप्प्यामधील पॅकेज C आणि D चा भाग असेल. या प्रकल्पाचे काम सहा पॅकेजेसमध्ये विभागले गेले आहे. मॅन्ग्रोव्ह पॅच, नद्या आणि खाड्यांमधून बोगदे जाणार आहेत. नद्या खाड्याच्या खालून जाणारा हा मुंबईतील पहिलाच वाहन बोगदा असेल. याआधी गोरेगाव मुलुंड लिंक रोडचे (GMLR) ट्वीन टनेल सुरु झाले. ते आधी विहार आणि तुळशी तलावांच्या खालून जातील असा प्रस्ताव होता. पण नंतर त्यामध्ये बदल करण्यात आला.
अभिजित बांगर, अतिरिक्त महापालिका आयुक्त

टनेल बोरिंग मशीन (Tunnel Boring Machine) वापरून 3 किमी लांबीचे बोगदे बांधले जाणार आहेत, त्याचा व्यास 14.2 मीटर इतका असेल. उर्वरित 700 मीटरमध्ये आयताकृती कट-आणि-कव्हर डिझाइन असा बोगदा असेल. त्यामध्ये 200 मीटरचा प्रवेश आणि निर्गमनसाठी 15.1 मीटरचा बोगदा असेल.

दोन्ही बोगद्यामध्ये प्रत्येकी तीन लेन असतील. त्याशिवाय पाच इमर्जन्सी क्रॉस आपातकालीन पॅसेज असतील. या प्रत्येक लेनची रुंदी ३६ ते ४५ मीटर इतकी असेल. या दोन्ही बोगद्यामध्ये सर्वप्रकारच्या आधुनिक यंत्रणा असतील. व्हेंटिलेशन, आग प्रतिबंधक यंत्रणा आणि हीट सेन्सर यासारख्या आधुनिक सोयी-सुविधा असतील.

खारफुटीचे संरक्षण करणे, पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी जमीनीच्या खालून बोगदा काढण्याचं ठरवल्याचं या प्रोजेक्ट्सवर काम करणारे बीएमसीचे अतिरिक्त महापालिका आयुक्त बांगर यांनी सांगितले.

कोस्टल रोडच्या सी आणि डी या पॅकेजेसमध्ये खारफुटीचे पॅच आहेत. खारफुटी तोडल्यास मोठं नुकसान होईल. त्याशिवाय पर्यावरणाचे संतुलनही बिघडेल. वृक्षारोपण केले तरी ही भरपाई भरुन निघणार नाही. एव्हाना ते सोप्पं नाही. त्यामुळेच सर्व आवश्यक तंत्रज्ञान आणि संसाधने वापरत या पॅकेजसाठी पूर्णपणे भूमिगत जाण्याचा मार्ग निवडला. त्यामुळे वरील पृष्ठभागावर परिणाम न करता नदी आणि खाडीच्या खाली बोगदे तयार केले जातील.
अभिजित बांगर, अतिरिक्त महापालिका आयुक्त

भूमिगत बोगदा तयार करताना चॅलेंज काय ? Construction Challenges

ट्वीन टनेल तयार करताना विविध मातीच्या परिस्थितीमुळे बांधकाम करताना अनेकड अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्याचा परिणाम टनेल बोरिंग मशीनवर होण्याची शक्यता आहे. या बोगद्याचे काम फेब्रुवारीमध्ये मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) ला देण्यात आले होते. पण बोगद्याचे काम सुरु करण्याआधी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEFCC) यांच्याकडून आवश्यक मंजुरी मिळत नाही, तोपर्यत काम सुरु करता येणार नाही.

कोस्टल रोड आणि दहिसर-भाईंदर लिंक रोड (DBLR) च्या फेज II साठी पर्यावरणीय मंजुरी कधी मिळेल, त्याची आम्ही वाट पाहत आहोत. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) कडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. येत्या काही महिन्यांत MoEFCC आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे.
अभिजित बांगर, अतिरिक्त महापालिका आयुक्त

पॅकेज A -

वर्सोवा आणि बांगूर नगर (गोरेगाव) दरम्यान 4.5 किमी

पॅकेज B

बांगूर नगर आणि माइंडस्पेस (मालाड) दरम्यान 1.66 किमी

पॅकेजेस C आणि D मध्ये दुहेरी बोगदे आहेत.

पॅकेज E

3.78 किमी , चारकोपला गोराईशी जोडेल.

पॅकेज F

3.69 किमी, गोराईला दहिसरशी जोडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

SCROLL FOR NEXT