SANJAY GANDHI NATIONAL PARK’S ASIATIC LION ‘BHARAT’ IN CRITICAL CONDITION saam tv
मुंबई/पुणे

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘भरत’ सिंहाची प्रकृती चिंताजनक

Sanjay Gandhi National Park Lion Critical Health Condition: मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'भरत' नावाच्या ४.६ वर्षीय आशियाई सिंहाची प्रकृती पुन्हा गंभीर झाली आहे. पाठीच्या कण्याला दुखापत झाली असून पशुवैद्यकीय टीम त्याच्यावर उपचार करत आहे.

Bharat Jadhav

  • SGNP मधील ‘भरत’ सिंहाची प्रकृती पुन्हा चिंताजनक.

  • एमआरआय तपासणीत जुन्या दुखापतीचा परिणाम स्पष्ट.

  • तज्ज्ञ पशुवैद्यकीय टीमकडून उपचार सुरू.

संजय गडदे,साम प्रतिनिधी

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आलेल्या “भरत” (L5) या ४.६ वर्षांच्या नर आशियाई सिंहाची प्रकृती पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनली आहे. गुजरातमधील जुनागढ येथील सक्करबाग झूलॉजिकल पार्कमधून २६ जानेवारी २०२४ रोजी प्राणी विनिमय कार्यक्रमांतर्गत भरतला मुंबईत आणण्यात आले होते.

उद्यान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ दरम्यान भरतच्या मागील पायांच्या हालचालींमध्ये असामान्यता दिसून आली होती. त्यानंतर त्याच्या चालण्यात बदल जाणवू लागल्याने वरिष्ठ तांत्रिक पशुवैद्यकीय समितीच्या मार्गदर्शनाखाली त्याची एमआरआय आणि एक्स-रे तपासणी करण्यात आली. तपासणीत जुन्या दुखापतीमुळे मज्जारज्जूवर परिणाम झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आवश्यक उपचार आणि सहायक व्यवस्थापन सुरू करण्यात आले. उपचारानंतर भरतच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली होती आणि त्याची स्थिती स्थिर झाली होती.

मात्र, मार्च २०२६ मध्ये भरत पुन्हा आजारी असल्याची लक्षणे दिसू लागली. त्यामध्ये भूक मंदावणे आणि सुस्ती यांचा समावेश होता. विविध प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी रक्ताचे नमुने आणि इतर जैविक नमुने पाठविण्यात आले. सातत्याने उपचार आणि निरीक्षण सुरू असूनही अपेक्षित सुधारणा दिसून आली नाही. त्यानंतर भरतवर पुन्हा भूल देऊन सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीसाठी वरिष्ठ तांत्रिक पशुवैद्यकीय समितीची बैठक घेण्यात आली असून मुंबईतील तज्ज्ञ पशुवैद्यकांचेही मार्गदर्शन घेण्यात आले आहे.

निश्चित विलगीकरण कालावधी आणि वैद्यकीय उपचारांनंतर भरतने पुन्हा आहार घेण्यास सुरुवात केली असून त्याच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र, एप्रिल २०२६ अखेरीस डाव्या भागातील निक्टिटेटिंग मेंब्रेन म्हणजेच डोळ्यावरील पडद्यामध्ये सूज आणि बाहेर येण्याची समस्या पुन्हा आढळून आली. त्यामुळे त्याच्यावर अधिक उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान, रक्त तपासण्यांमध्ये गंभीर परजीवी संसर्गाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच जुन्या दुखापतीमुळे किंवा हालचालीदरम्यान झालेल्या संभाव्य आघातामुळे गुंतागुंत निर्माण झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी पुढील पुष्टीकरण आणि तुलनात्मक तपासण्यांसाठी अतिरिक्त नमुने विविध प्रयोगशाळांकडे पाठविण्यात आले आहेत.

सध्या भरतमध्ये मागील पायांमध्ये अशक्तपणा (hind limb paresis) दिसून येत असून डोळ्यावरील पडद्याची सूज कायम आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ तांत्रिक समिती सदस्य आणि मुंबईतील तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली भरतवर सातत्याने उपचार, निरीक्षण आणि सहायक व्यवस्थापन सुरू आहे.

भरतच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या सर्व निदान, उपचार आणि सहाय्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे उद्यान प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT