Maharashtra RTO fancy number registration guide  saam tv
मुंबई/पुणे

मुंबई-पुण्यातील वाहन नंबर सिरीज संपली; तुमच्या पसंतीचा वाहन क्रमांक मिळणार; कुठे आणि कसा कराल अर्ज?

MH01FL Series Launched: मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी खासगी वाहनांसाठी MH01FL ही नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक वाहनधारकांनी १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करावा.

Bharat Jadhav

  • मुंबई (मध्य) आरटीओमध्ये MH01FK मालिका संप

  • वाहनधारकांना पसंतीचा किंवा आकर्षक वाहन क्रमांक आगाऊ आरक्षित करण्याची संधी

  • इच्छुकांनी १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत विहित शुल्कासह अर्ज सादर करावा.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे दुचाकी खासगी संवर्गातील वाहनांसाठी MH01FK ही नोंदणी मालिका संपली आहे. त्याऐवजी MH01FL ही नवीन नियमित मालिका सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील पसंतीचा वाहन क्रमांक आरक्षित करून घेण्यासाठी वाहनधारकांनी सोमवार, १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी केली जाते. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील सुधारित नियम ५४(अ) नुसार विहित शुल्क भरून आकर्षक अथवा पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आगाऊ आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी कार्यालयाच्या विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक शुल्काचा धनादेश "प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (मध्य)" / "Regional Transport Office, Mumbai (Central)" यांच्या नावे सादर करावा लागतो. आरक्षित केलेल्या वाहन क्रमांकाची वैधता १८० दिवसांची असून, या कालावधीत संबंधित वाहनाची नोंदणी करणे आवश्यक आहे. आरक्षित क्रमांकाची पावती वाहनाच्या डेटा एन्ट्रीवेळी ‘वाहन-०४’ प्रणालीमध्ये नोंदविल्यानंतर संबंधित वाहनाला तो क्रमांक मंजूर केला जातो.

वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी फोटो असलेले ओळखपत्र, निवासाचा पुरावा, पॅनकार्ड आणि वाहन खरेदीची पावती ही कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्जाचे नमुने कार्यालयातील खिडकी क्रमांक E-11 येथे उपलब्ध असून, मार्गदर्शनासाठी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. MH01FL या नवीन मालिकेतील पसंतीचा वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी अर्ज आणि विहित शुल्क दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत खिडकी क्रमांक E-11 येथे ऑल्विन पॉल यांच्याकडे सादर करता येईल.

एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास त्याच दिवशी दुपारी २ वाजता लिलाव पद्धतीने संबंधित नोंदणी क्रमांक मंजूर करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) अनिल पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

लाखो कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹25,000 बेसिक पगार असलेल्यांनाही मिळू शकतो पेन्शनचा लाभ; जाणून घ्या संपूर्ण अपडेट

नवीन टॅक्स दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर; कर ते गुंतवणूक....काय काय बदलणार?

CJP: कॉक्रोच जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा; समितीवर ११ जणांची नेमणूक; कुणाकडे कोणती जबाबदारी?

Raigad Tourism : मुंबई-पुण्याजवळचं 'हे' ऑफबीट पिकनिक स्पॉट पाहिलंत का? सौंदर्य पाहून क्षणात पडाल प्रेमात

SCROLL FOR NEXT