IMD Predict Mumbai Heavy Rain Alert Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Rains : मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात पुढील 3-4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात काय स्थिती?

Weather Forecast : अंधेरीत देखील जोरदार पाऊस कोसळत असून त्यामुळे सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Rain :  मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. वामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस होणार आहे.

अंधेरीत देखील जोरदार पाऊस कोसळत असून त्यामुळे सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या सब वेमध्ये देखील पाणी साचले आहे. सब वेमध्ये चार फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे अंधेरी सब वेमधून वाहनांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी उभे राहून अंधेरी पश्चिमेची एसव्ही रोडवरून सरळ वाहतूक सुरू केली आहे. तर पूर्वेकडील वाहनांना पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. (Latest Marathi News)

6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान खात्याने गुरुवारी राज्यातील सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट मुंबईला लागून असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि पुण्याला देण्यात आला आहे. यासोबतच मुंबईसह सात जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजनुसार, रायगड, पालघर आणि पुणे येथे ३० जून रोजी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक आणि सातारा येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सक्रिय मान्सूनच्या स्थितीमुळे पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जीवाशी खेळ! पुण्यात बनावट गुटख्याचा कारखाना; पोलिसांकडून कारवाईत १ कोटींचा मुद्देमाल जप्त

Akola News: अकोल्यात विद्यार्थ्यांकडून पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे? व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Maharashtra Live News Update : दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाईटमध्ये २५० हून अधिक प्रवासी अडक

Navale Bridge: एक चूक पडेल महागात! नवले पुलावरील अपघातांनंतर मोठा निर्णय, पुणे पोलिसांकडून नवीन नियमावली जाहीर

पनवेलजवळ अपघात, रेल्वे ट्रॅकवरून मालगाडी घसरली, VIDEO

SCROLL FOR NEXT