Mumbai Rainfall Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Rain Video: मुंबईत कोसळधार! सखल भागांमध्ये साचले पाणी, रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी; कामावर निघालेल्या मुंबईकरांचे हाल

Priya More

मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस (Mumbai Heavy Rainfall) पडत आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे. सायन, माटुंगा, दादर, हिंदमाता, वडाळा परिररामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबईतील अनेक मुख्य रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकलची सेवा देखील विस्कळीत झाली आहे. तिन्ही रेल्वे मार्गाची वाहतूक १५ ते २० मिनिटं उशराने सुरू आहे.

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. सकाळपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. कुर्ला, चेंबूर, टिळकनगर, सायन, माटुंगा, दादर परिसरात पाणी साचले आहे. मुंबईतल्या अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे या पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. हा सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

पावसामुळे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरू आहे. तर पश्चिम आणि हार्बर रेल्वेसेवा देखील उशिराने सुरू आहे. तर रस्ते वाहतुकीवर देखील पावसाचा परिणाम झाला आहे. इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेसह मुंबईतील अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतुकीवर पावसामुळे परिणाम झाल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहे. कामावर निघालेल्या मुंबईकरांना ऑफिसला पोहण्यास उशिर होणार असून आजही लेटमार्क लागणार आहे.

दरम्यान, मुंबईला आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढच्या आठवड्यात १७, १८ आणि १९ जुलै रोजी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

SCROLL FOR NEXT