Mumbai Rain Update: मुसळधार पावसानं मुंबईकरांचे हाल, रेल्वेसेवा कोलमडली, रस्त्यावर वाहतूक कोंडी; 'साम'चा ग्राउंड रिपोर्ट

Mumbai Local Train And Traffic Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे लोकलसेवा काही काळ ठप्प झाली होती पण नंतर ती हळूहळू पूर्वपदावर आली. पण लोकलसेवा उशिराने सुरू असल्याने मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
Mumbai Rain Update:  मुसळधार पावसानं मुंबईकरांचे हाल, रेल्वेसेवा कोलमडली, रस्त्यावर वाहतूक कोंडी; 'साम'चा ग्राउंड रिपोर्ट
Mumbai Rain Update Saam Tv
Published On

मुंबईत मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे(Mumbai Rainfall) मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. पावसामुळे मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकलसेवा (Mumbai Local) विस्कळीत झाली. अनेक रेल्वे स्थानकांवर रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे लोकलसेवा काही काळ ठप्प झाली होती पण नंतर ती हळूहळू पूर्वपदावर आली. पण लोकलसेवा उशिराने सुरू असल्याने मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पावसाचा फटका मध्य, हार्बर आणि वेस्टर्न रेल्वे मार्गाला बसला. तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवा कोलमडली. लोकलसेवा २० ते २५ मिनिटं उशिराने सुरू असल्यामुळे ट्रेनला प्रचंड गर्दी आहेत. अशामध्ये मुंबईकरांना ऑफिसला पोहण्यासाठी उशिर होताना दिसत आहे.

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडूप, विद्याविहार, कुर्ला आणि सायन रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे लोकलसेवा ठप्प झाली होती. पण पावसाचा जोर कमी झाल्यानंतर हळूहळू रेल्वे रुळावरील पाणी ओसरले. त्यानंतर लोकलसेवा सुरू झाली. सध्या मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मध्य रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी आहे. घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वे स्थानकावर तर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. गर्दी असल्यामुळे अनेक प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नसल्याने सोडून द्यावी लागत आहे. त्यामुळे त्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहण्यासाठी उशिर होत आहे. रोज एक ते दीड तास लागणाऱ्या प्रवासाला आज लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे अडीच ते तीन तास लागत असल्याचे काही प्रवाशांचे म्हणणे होते.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेक मुंबईकरांना लेटमार्क लागला. तर गर्दीमुळे रेल्वे स्थानकावर एक ते दीड तास लोकलची वाट पाहिल्यानंतर काही प्रवाशांनी घरी जाणे पसंत केले. काही प्रवासी ऑफिसला पोहचले खरे पण त्यांना दीड ते दोन तास उशिर झाला. त्यामुळे आज अनेक मुंबईकरांना लेटमार्क लागला. तर काही ऑफिसने कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होम दिल्याने काही प्रवासी रेल्वे स्थानकावरून घरी परत गेले. घाटकोपर आणि विद्याविहार येथून सुटणाऱ्या लोकल या पुढे जात होत्या पण काही अंतरावर गेल्यानंतर या लोकल एकापाठोपाठ एक थांबत होत्या. रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे लांबपल्ल्याच्या अनेक रेल्वे देखील खोळंबल्या होत्या.

Mumbai Rain Update:  मुसळधार पावसानं मुंबईकरांचे हाल, रेल्वेसेवा कोलमडली, रस्त्यावर वाहतूक कोंडी; 'साम'चा ग्राउंड रिपोर्ट
Maharashtra Rain Update: राज्यात कोसळधार! कोकणाला पावसाने झोडपलं, नदी-नाल्यांना पूर; शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर

तर दुसरीकडे, लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे काहींनी बस किंवा रिक्षाचा पर्याय निवडला. वाहतूक कोंडीमुळे बस देखील उशिराने धावत होत्या. घाटकोपर पश्चिमला काही दुकानांमध्ये पावसामुळे पाणी शिरले होते. जवळपास गुडघाभर पाणी या दुकानांमध्ये साचले होते तसंच या दुकानांमध्ये गाळ देखील साचला होता. त्यामुळे अनेक ड्रेस, कुर्ता तसंच कॉस्मेटिक्सच्या दुकानांमधील साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हे दुकान चालक चिंतेत आले आहेत. गटारांची व्यवस्थित स्वच्छता न केल्यामुळे आणि चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्यामुळे दुकानात पाणी शिरल्याचा आरोप या दुकान चालकांनी केला आहे.

Mumbai Rain Update:  मुसळधार पावसानं मुंबईकरांचे हाल, रेल्वेसेवा कोलमडली, रस्त्यावर वाहतूक कोंडी; 'साम'चा ग्राउंड रिपोर्ट
Andheri Subway Rain : अंधेरी सब-वे पूर्णत: पाण्याखाली, रस्त्यावर ५ फुटांपर्यंत पाणी; पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com