Hoarding Collapsed On Petrol Pump In Ghatkopar Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Rain Update: घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर मोठं होर्डिंग कोसळले, 150 ते 200 जण अडकल्याची भीती

Hoarding Collapsed On Petrol Pump In Ghatkopar: या घटनेमध्ये ७ जण जखमी झाले आहेत. जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Priya More

घाटकोपरमध्ये (Ghatkopar) पेट्रोलपंपावर मोठं होर्डिंग कोसळ्याची घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे होर्डिंग कोसळले. होर्डिंगखाली ८० वाहनं अडकल्याची शक्यता आहे. तसंच, १५० ते २०० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमध्ये ७ जण जखमी झाले आहेत. जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळील पेट्रोल पंपावर अचानक होर्डिंग कोसळले. घाटकोपर पूर्वच्या पंतनगरमधील पोलिस ग्राऊंडजवळ हा पेट्रोल पंप आहे. सायंकाळी साडेचारच्या सुमारास या पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले. जोरदार वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे होर्डिंग कोसळले. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक जण आपल्या वाहनांसह या पेट्रोल पंपात थांबले होते. तेवढ्यात ही मोठी दुर्घटना घडली.

होर्डिंग कोसळल्यामुळे पेट्रोल पंपाचे मोठे नुकसान झाले आहे. होर्डिंगसह पेट्रोल पंपाचे छत वाहनांवर कोसळले. या खाली १५० ते २०० जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमध्ये ७ जण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या घटनेत होर्डिंगखाली अनेक वाहनं दबल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. या घटनेमुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. दरम्यान, वडाळ्यामध्ये देखील वादळी वाऱ्यामुळे पार्किंग लिफ्ट कोसळली. या पार्किंग लिफ्टखाली अनेक वाहनं अडकली असून त्यांचे नुकसान झाले आहे. याठिकाणी देखील मदतकार्य सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT